Wednesday, 12 January 2022

कल्याणमधील तीन दुकानांना भीषण आग ! "शेकडो पक्षांसह मासे, प्राणी जळून खाक"

कल्याणमधील तीन दुकानांना भीषण आग ! "शेकडो पक्षांसह मासे, प्राणी जळून खाक"


कल्याण, बातमीदार : कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात मेन रोडवर असलेल्या तीन दुकानांना भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या शेकडो पक्षी, प्राणी, मासे जळून खाक झाले आहेत.

कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात विविध पाळीव पक्षी, प्राणी व मासे विक्रीची दुकाने आहे. त्यातच आज सकाळच्या सुमारास एका दुकानात अचानक आग लागली होती. या आगीने काही क्षणातच भीषण रूपधारण केल्याने त्या दुकानाच्या लगत असलेली आणखी दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे भीषण आगीतूनही अग्निशमन दलाच्या जवानांनी बहुतांश पक्ष्यासह प्राण्यांना वाचविण्यात यश आले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...