Tuesday, 18 January 2022

आपटी गावातील ग्रामस्थांचा पोटाची खळगी भरण्यासाठी उल्हास नदीतून जीवघेणा प्रवास, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ?

आपटी गावातील ग्रामस्थांचा पोटाची खळगी भरण्यासाठी उल्हास नदीतून जीवघेणा प्रवास, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या शेतीप्रधान गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे अत्यंत जीवघेणा व अंगावर शहारे आणनारा प्रवास करावा लागत असून लोकप्रतिनिधी व निगरगट्ट प्रशासकीय अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे आज त्यांच्या वर ही वेळ आली आहे.


उल्हास नदीच्या काठावर आपटी हे गाव वसलेले आहे. पुर्वीच्या काळात शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी गावातील तरुण येथे कामधंद्यानिमित्ताने उल्हास नदीतून जात येत होते, येथे उल्हास व बारवी नदीचा संगम होत असल्याने जांभूळ एमआयडीसी ने येथे पाणसाठवण बंधारा बांधला होता. 


वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या लोकांचा रस्ता बंद झाला होता. आपटी गावातील तरुण विनोद शिसवे, भानूदास भोईर, सुरज भेरले, चेतन शिसवे, विघ्नेश म्हसकर, विजय शिसवे, दिपक शिसवे तूकाराम शिसवे, प्रदिप म्हसकर, भारत शिसवे, विशाल भेरले, किरन शिसवे, रामचंद्र शिसवे, उमेश शिसवे, राजेश शिसवे, गणेश शिसवे आदी ५०/६० तरुण या मार्गाने एमआयडीसी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी ये जा करीत होते त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडून जायचं असेल तर २०/२५ किमी अंतर जावं लागत असे. यामुळे पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडत होते. कोरोनाच्या लाँकडाऊन मुळे अगोदरच अनेकांचे रोजगार गेले होते. ज्यांचे होते ते रस्त्याच्या अडचणी मुळे जाणार होते. त्यामुळे ते जाऊ नये म्हणून हे तरुण अंत्यत जीवघेणा बाईक प्रवास करतात, थोडाजरी तोल गेला तर सरळ उल्हास नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची भिती असते.


त्यांची ही अडचण त्यांनी आमदार, खासदार, झेडपी सदस्य, नेते, पुढारी आदी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना सांगितली परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही असा आरोप या तरुणांनी केला आहे. तसेच येथे अनेकांचे जीव गेले आहेत, पाण्यात पडून वाहून गेले आहेत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ रस्त्या अभावी या लोकांवर असा जीवघेणा, अंगावर शहारे आणनारा केवळ एका लोंखडी चँनेलवरुन प्रवास करावा लागतो आहे. यामुळेच तालुक्याचा 'विकास' कुठे झाला, तो कुठे हरवला हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया :- 

आमच्या या जिवघेण्या प्रवासाबद्दल आम्ही आमदार, खासदार, एमआयडीसी चे अधिकारी या सर्वांना सांगितले, पण अद्याप कोणी लक्ष दिले नाही - विनोद शिसवे, ग्रामस्थ, आपटीगाव.

या रस्त्यावर जातांना येताना अनेकांचे जीव गेले आहेत, अजून किती जणांचा बळी गेल्यावर यांना जाग येईल?शत्रुघ्न शिसवे (पोलीस पाटील, आपटीगाव, ता. कल्याण)

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...