उल्हासनगरच्या बिल्डरला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक ! ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केली कारवाई !!
याबाबत सविस्तर वृत्त असं की २०१५ मध्ये आरोपीनं त्याच्या आठ भागिदारांसोबत उल्हासनगरमध्ये एका प्लॉटमध्ये बांधकाम सुरु केलं होतं. नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या पैशांवर अधिकचा परतावा देण्याचं आमिष या आरोपींनी दाखवलं होतं. आरोपीने सुरवातीवा गुंतवणूकदारांना काही रक्कम परत दिली. मात्र नंतर पैसे देणे बंद केलं.
गुंतवणूकदारांचा विश्वास तोडल्याने आणि त्यांची फसवणूक केल्याने गेल्यावर्षी एमपीआयडी कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मनमोहन दुबई येथून येत असताना त्याला विमानतळावर पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

No comments:
Post a Comment