Saturday, 8 January 2022

कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशनची रेझिंग डे निमित्त सायबर जनजागृती !!

कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशनची रेझिंग डे निमित्त सायबर जनजागृती !!


कल्याण, बातमीदार : ठाणे शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत महात्मा फुले पोलीस स्टेशन, कल्याण येथे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह २ ते ८ जानेवारी दरम्यान साजरा केला गेला, रेझिंग डे निमित्त सायबर गुन्हे व वापरा विषयी जनजागृती करण्यात आली. 

अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपायुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी मोबाईल, संगणक, इंटरनेट वर आपली गोपनीय माहिती उदा. पिन नंबर, पासवर्ड, कार्ड नंबर, किंवा कोणतीच वैयक्तिक माहिती देऊ नये. तसेच कोणत्याही आमिषाला जसे ऑनलाईन लॉटरी, लकी ड्रॉ, वैयक्तीक कर्जाच्या, नोकरीच्या ऑफर यांना फसू नये. कोणतीही शंका आल्यास स्थानिक पोलीस स्टेशन सोबत संपर्क करावा. असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...