Tuesday, 18 January 2022

ह व ड प्रभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

ह व ड प्रभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, देवीचा पाडा येथील बांधकामधारक जीतू म्हात्रे यांच्या तळ+२ मजल्याच्या आर.सी.सी इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 4 ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व परिसरातील रामा कृष्णा सोसायटी, खडेगोलवली येथे मोबाईल टॉवरच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई आज अनधिकृत बांधकाम विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने व 1 ब्रेकरच्या सहाय्याने केली.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...