Tuesday, 18 January 2022

पोळीभाजी केंद्र वाचवण्यासाठी तिने केली महिलेची हत्या... "घरी सोबत येण्याचा बहाणा"..

पोळीभाजी केंद्र वाचवण्यासाठी तिने केली महिलेची हत्या... "घरी सोबत येण्याचा बहाणा"..


डोंबिवली, हेमंत रोकडे :  घरी एकटी राहणाऱ्या विजया बाविस्कर या 58 वर्षीय महिलेचा रविवारी रात्रीच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकातील आशिष शीला इमारतीत घडली. या हत्येतील मारेकरी महिलेला टिळकनगर पोलिसांनी २४ तासात तपास करून अटक केली. हत्या करणाऱ्या महिलेचे शेलार चौक समोर पोळी भाजी केंद्र असून यावर बँकेची जप्ती येणार होती. आपले पोळी भाजी केंद्र वाचवण्यासाठी तीने बाविस्कर यांच्याशी ओळखीचा फायदा घेईन रात्री सोबत येण्याचा बहाणा केला. बाविस्कर या झोपेत असताना महिलेने तिचा गळा आवळून हत्या केली. तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन घेऊन पसार झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, सीमा अनिल खोपडे ( ४०) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सीमा हिची विजया बाविस्कर या महिलेशी ओळख होती. सीमा ही कर्जबाजारी झाल्याने तिचे आशीर्वाद पोळी भाजी केंद्रावर बँक जप्ती आणणार होते. आपली मैत्रीण विजया घरी एकटीच राहत असल्याने सीमा हिने चोरीच्या उद्देशाने तिच्या घरी झोपण्यासाठी येण्याचा बहाणा केला. रविवारी रात्री सीमा बाविस्कर यांच्या घरी आली. 


रात्री बाविस्कर झोपलेली पाहता या संधीचा फायदा घेत सीमाने तिचा गळा आवळून हत्या केली. बाविस्कर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, कानातील रिंगा, अंगठी, बांगड्या घेऊन निघाली. घरातून बाहेर पडल्यावर सीमाने बाविस्कर यांच्या घराला बाहेरून कडी लावली. आपल्याला कोणी पाहू नये म्हणून सीमाने तोंडावर टॉवेल गुंडाळून इमारतीच्या बाहेर चालत चालत बाहेर पडली. मात्र इमारतीच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याची माहिती सीमा नव्हती. या कॅमेरात सीमा रात्री रस्त्यावरून संशयीतरित्या चालताना दिसली.
टिळकनगर पोलीस ठाण्यात बाविस्कर यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तपासात अनेकांची चौकशी केली. मात्र कोणताही धागा सापडत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. सीसीटीव्ही कॅमेरात एक महिला रात्रीच्या वेळी आशिष शीला इमारतीतून बाहेर पडताना दिसली. परंतु तिचा चेहरा स्पष्ट दिसत दिसत नव्हता. पोलिसांनी नेमका हाच धागा पकडत चौकशी सुरू केली. सिमा पर्यत पोलीस पोहचले मात्र पुरावा नसल्याने तिची चौकशी सुरू केली. विजया बाविस्कर हिचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांना तिच्या घरी चोरी केलेले सोन्याचे दागिने मिळाले. चोरीच्या उद्देशाने हा खून झाला आल्याचे डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. सदर गुन्हयात आणखी कोणी आरोपी आहेत का अथवा सदरचा गुन्हा काही मालमत्तेच्या वादातुन झाला आहे काय याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अपोआ कराळे, पोउपआ सचिन गुंजाळ, सपोआ जयराम मोरे, वपोनि अजय आफळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि चुंबळे, सपोनि बाकले, पोउपनिरी धोंडे, प्रमपोउपनिरी मुंजाळ (टिळकनगर पोलीस ठाणे), सपोनि वणवे, पोउपनिरी तारमळे (मानपाडा पोलीस ठाणे) पोउपनिरी शिंगटे (डोंबिवली पोलीस ठाणे) पोउपनिरी मोरे (विष्णुनगर पोलीस ठाणे) यांनी व पोलीस अंमलदार यांनी अत्यंत मेहनत घेवुन अहोरात्र तपास करून सदरचा गुन्हा सुमारे २४ तासाचे आत उघडकीस आणला.


मारेकरी सीमा खोपडे हिने विजया बाविस्कर हिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बाविस्कर यांचा मोबाईल टॉयलेट मध्ये टाकला होता. पोलिसांनी तपासात बाविस्कर यांचा मोबाईल हस्तगत केला आहे. या व अनेक गुन्ह्यांचा तपासात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरेची मदत मिळते असते. त्यामुळे प्रत्येक सोसायटीने आपल्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आवाहन डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...