Wednesday, 12 January 2022

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना कोरोनाची लागण !!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना कोरोनाची लागण !!


कल्याण, हेमंत रोकडे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही राजकीय नेते आणि मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना कोरोनाची लागण झाली आहे. ते होम क्वारंटाईन झाले आहेत.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आयुक्त सूर्यवंशी यांनी बूस्टर डोस घेतला होता. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली आहे. महानगरपालिकेच्या 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...