Wednesday, 12 January 2022

प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ; कल्याण शहरात 'काँग्रेस प्रणित युनियन' स्थापना !

प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ; कल्याण शहरात 'काँग्रेस प्रणित युनियन' स्थापना !


कल्याण, हेमंत रोकडे : अखिल महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघ या काँग्रेस प्रणित इंटक महाराष्ट्र प्रदेश चे संस्थापक जयप्रकाश छाजड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक सरचिटणीस कोणार्क देसाई यांच्या नेतृत्वामध्ये संस्थेचे अध्यक्ष फैज मुल्ला यांच्या संघटन कौशल्यातून कल्याण पश्चिम येथील सर्वोदय मॉल, वलीपिर मार्ग आणि जे पी रिसॉर्ट मार्ग येथिल जंक्शन वर रिक्षा मालक चालक संघटनेतर्फे नागरिकांना सोई सुविधा व्हाव्यात म्हणून रिक्षा स्टँड उभारण्यात आले.


या कार्यक्रमाचे काँग्रेसप्रणित युनियनच्या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा सर तसेच श्रीमती सोनिया ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजी घाग यांनी सर्वच पदाधिकारी यांचे कौतुक केले.आणि कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेस सामान्य माणसाच्या सोई सुविधा साठी कार्यरत राहील याची गवाही दिली.


काँग्रेस नेत्या आणि तरुणांचे प्रेरणास्थान प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून क.डो.म .पा. मधील कार्यक्रत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकदिलाने कार्यरत दिसत होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...