सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी !!
जळगाव, बातमीदार : शि.प्र. मंडळ संचलित सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सौ. शितल वारूळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment