Sunday, 23 January 2022

दुसर्‍यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःत परिवर्तन करा संत राजिन्दर सिंह जी महाराज !!

दुसर्‍यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःत परिवर्तन करा
संत राजिन्दर सिंह जी महाराज !!


स्वामी रामतीर्थ जी म्हणतात आपल्याला अशाच समाजसुधारकांची गरज आहे, जे दुसऱ्यांना सुधारण्या ऐवजी स्वत: मध्ये सुधार करण्याची गरज आहे असे मानतात. ते आपल्या शिष्यांना नेहमीच समजावित की दुसऱ्यांना समजाविण्यात वेळ खर्च करू नका. त्यांना माहित होते की, जीवनाचे ध्येय स्वतःला ओळखायचे आणि प्रभू परमात्म्याला प्राप्त करणे हे आहे. हे तेव्हाच पूर्णपणे शक्य आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवेल. त्यांची इच्छा असते की आपण आपला मौल्यवान वेळ दुसऱ्यांची चेष्टा, गप्पा गोष्टी आणि दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपण स्वतःकडे पहावे आणि आपल्या स्वत:च्या उणीवा शोधाव्या आणि त्यामध्ये सुधारणा करावी.  

आपण नैतिक गुण धारण करतांना मन, वचन आणि कृतीद्वारे चुका करतो. त्यांना सुधारण्याची आवश्यकता आहे. जो वेळ आपण स्वतःला सुधारण्या करिता लावतो तो जर दुसऱ्यांची टीका करण्यात लावत असू तर आपण केवळ आपलाच वेळ व्यर्थ वाया घालवत आहोत आणि आपल्या कर्माचे ओझे वाढवित आहोत. 

परिवर्तन एव्हढे सोपे नाही कारण की मनुष्य स्वतःला बदलू इच्छित नसतो. जर आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करीत राहिलो तर त्यामध्ये आपल्याला कधीही यश प्राप्त होणार नाही. आपल्या करिता काय चांगले आहे हे कळत असताना देखील आपण आपल्यात बदल घडवीत नाही. उदाहरणार्थ आपल्या स्वाथ्या करीता कोणते पदार्थ आपल्याला हितकारक आहेत आणि कोणते पदार्था मुळे आपल्याला आजारपण येऊ शकते? शिक्षणाच्या क्षेत्रात देखील आपण जाणतो की, चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या चांगल्या सवयी असतात ज्या त्याला यशाकडे घेऊन जातात आणि अशा कोणत्या सवयी आहे ज्या त्याच्या अपयशाचे कारण बनतात?. 
मनुष्य चांगल्या आणि वाईट सवय विषयी समजतो. परंतु करतो तेच की ज्या त्याच्या पहिल्या सवयी आहे. जे लोक चांगल्या सवयी जीवनात आणून त्याच आपल्या जीवनात आचरणात आणतात त्यांचे जीवन यशस्वी होते. जे लोक वाईट सवयी स्वीकारतात ते त्यांच्या बरोबरच जगतात, संघर्ष करीत असतात आणि नेहमी अपयशी ठरतात. जर आपल्याला नेहमी वाईट गोष्टींची सवय लागली तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण तिला बदलण्या ऐवजी त्या वाईट सवयींना चिकटून राहतो. परिणामी वारंवार दुःख आणि अडचणी सहन करतो. बरेचसे लोक जाणतात कि धूम्रपान केल्याने फुप्फुसांचा कॅन्सर होतो आणि आपले तो जीवघेणा देखील होऊ शकतो. तरी देखील अनेक लोक धूम्रपान करतात. लोकांना हे देखील माहीत आहे की, दारू पिऊन गाडी चालवु नये परंतु काही लोक नशेमध्ये गाडी चालवीतात. यामुळे दुर्घटना होऊ शकते. लोकांना माहीत आहे की काय चांगले आहे, काय वाईट आहे, तरीदेखील लोक आपल्या सवयी बदलण्याचे नाकारतात. 
जेव्हा आपण आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपणास न बदलण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण कर्माच्या नियमाला जाणतो की 'करावे तसे भरावे'. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होते. जर आपण दुसऱ्यांच्या प्रति हिंसक वागलो, तर कधी आपल्याला सुद्धा त्याचा सामना करावा लागतो. परतफेड करावी लागते. जर आपण सत्याने वागलो नाही तर त्या घटनेच्या नुसार परिणामस्वरूप त्याची परतफेड करावी लागेल. आपण हेही जाणतो की आपला अहंकार दुसऱ्याच्या मनाला आघात पोहोचवतो. तर आपल्याला देखील दुखी अस्वस्थ व्हावे लागेल. आपल्याला माहित आहे की, जर आपण स्वार्थी राहिलो तर त्याचा परिणाम एक ना एक दिवस आपल्याकडे परत येईल. आपण आपल्या कृतीच्या परिणामापासून वाचु शकत नाही. हे माहित असून देखील लोक क्रोध, वासना, लोभ, मोह आणि अहंकार या पाच घातक चोरांच्या जाळ्यात अडकलेले असतात. 

आपण आपल्या चुकीच्या सवयींचे आधीन झालेलो आहोत कारण की आपण मनाचे कैदी झालेले आहोत. जो आपल्याला या दुनियेत अडकवून ठेवू इच्छितो. जोपर्यंत आपण या सवयींचे आधिन राहू तोपर्यंत त्या सवयी बदलणे कठीण होत जाते. कारण की काळानुसार या सवयी माणसाच्या स्वभावात बदलत जातात.
ज्यावेळेस चुकीच्या सवयींची माहिती होते त्याच वेळी आपण त्यांना बदलले पाहिजे. आपण स्वतःला तपासले पाहिजे आणि चांगल्या करिता या सवयींना बदलण्याकरिता आपण नेहमीच सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. 

चांगल्या सवयी आपण आपल्या अंतरी स्वीकारू शकतो. ज्या आपल्या आत्म्याला देह भावनेच्या वर नेऊन अंतरिक मंडळाच्या यात्रेमध्ये प्रभुशी एकरूप होण्यात साहाय्यक ठरतील. 

चलातर! आपल्याकडे या संसारा मधून मुक्त होण्या करीता एक सुवर्णसंधी आहे. प्रभूने दिलेल्या या मानव शरीराचा पूर्ण लाभ घेऊया, जेणेकरून आपण चुकीच्या सवयींना काढून टाकूया आणि परमपिता परमात्मा च्या खऱ्या धामी याच जन्मात परत जाऊया.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...