Wednesday, 23 March 2022

थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या पुण्यतिथी दिनी (शहीद दिन) महापालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली !!

थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव  यांच्या पुण्यतिथी दिनी (शहीद दिन)  महापालिकेतर्फे  भावपूर्ण आदरांजली !!
   
 
कल्याण, हेमंत रोकडे : थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरणार्थ आजचा दिवस *"शहीद दिवस"* सर्वत्र ओळखला जातो. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या आजच्या पुण्यतिथी दिनी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
 महापालिका मुख्यालयात सहा. संचालक नगररचना दिशा सावंत, कर विभागाचे उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...