Friday, 25 March 2022

कल्याण शहरात मंगळवारी पाणीपुरवठा रहाणार बंद !!

कल्याण शहरात मंगळवारी पाणीपुरवठा रहाणार बंद !!


कल्याण, बातमीदार : कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी आणि विद्युत उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी येत्या मंगळवारी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणीपुरवठा कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली, कोळसेवाडी, विजय नगर, चिंचपाडा, नेतीवली, तिसगाव, चक्की नाका परिसर, कल्याण पश्चिमेतील पारनाका, बाजारपेठ, बैलबाजार, मुरबाड रोड, चिकणघर, गांधारे, बारावे, बेतुरकर पाडा, खडकपाडा, आधारवाड, मोहने, आंबिवली, बिर्ला महाविद्यालय परिसर, नवीन कल्याण परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी दुरुस्तीचे काम असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी मुबलक पाणीसाठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...