माजी सैनिकांकरीता पुणे येथे सदनिका राखीव !!
*15 एप्रिल 2022 अर्ज करण्याची अंतिम मुदत*
पुणे, बातमीदार : संरक्षण दलातील किंवा सिमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेल्या व्यक्तींचे कुटूंबिय अथवा लढाईत जखमी होवून अपंग झालेले माजी सैनिक यांच्या करिता सदनिका पुणे येथे राखीव ठेवण्यात आल्या आहे. यामध्ये अपंग झालेल्या माजी सैनिकांकरीता 15 सदनिका, माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांच्याकरिता 16 सदनिका अशा 31 सदनिका राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत काढण्यात येत आहे. ताथवडे, पुणे येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 680 मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांची जाहिरात प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर योजना मुंबई- बंगलोर हायवे लगत आहे. सदर योजने अंतर्गत सदनिकांचे चटई क्षेत्र फळ 851.00चौ. फुट इतके असून या गाळयांची किंमत रु 68.00 लक्ष (कार पार्किंगसहित) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे. म्हाडाचे ऑनलाईन अर्जाकरिता संकेतस्थळ :https://lottery.mahada.gov.in आहे. तसेच हेल्पलाईन नं. 020- 26592692, 26592693 भ्रमणध्वनी क्रमांक 9869988000 असून बँकेचा हेल्पलाईन क्रमांक 020-26151215 आहे. ऑनलाईन पेमेंटच्या अधिक माहितीसाठी संपर्क 8806110088 असून ई-मेल kalpesh.lawanghare@payu.in असा आहे, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment