Monday, 4 April 2022

डॉ. आंबेडकर जयंतीचा उपक्रम, शासकीय योजनेचा अभ्यास, विकासाचा ध्यास - डॉ. आदर्श भालेराव

डॉ. आंबेडकर जयंतीचा उपक्रम, शासकीय योजनेचा अभ्यास, विकासाचा ध्यास - डॉ. आदर्श भालेराव 


कल्याण, बातमीदार : १४ एप्रिल डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस, हा दिवस सर्व देशभर आणि जगात सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी, बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचे जीवन व कार्याची उजळणी केली जाते. संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान मूल्यांवर चर्चा होते. संविधानाचे विचारमुल्ये सर्वत्र पोहचविण्याचा हा एक उत्तम दिवस आहे. समाजात हा दिवस मनोभावे साजरा होतो. परंतु सर्वच समाजात होत नाही. बाबासाहेबांच्या संविधानामुळे ज्यांना ज्यांना संधी मिळाली, अधिकार मिळाला त्या सर्वांनी, विशेषतः महिलांनी हा दिवस साजरा केला पाहिजे. बाबासाहेबांची प्रतिमा घरोघरी लावली पाहिजे. महामानव कोणत्या एका समाजाचे नसतात, सगळ्यांचे असतात. तेव्हा सगळ्यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे. जातीयतेतून महामानवाकडे पाहणे बरोबर नाही.

२१ व्या शतकात आणि येणाऱ्या काळात, उज्वल भविष्यासाठी, सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी बाबासाहेब यांना समजून घेण्याची फार गरज आहे. जगात बाबासाहेब पोहचले परंतु भारतात घरोघरी अजूनही पोहचले नाही. जातीचा दृष्टीकोन बाजूला ठेवून, बाबासाहेबांनी आदर्श समाज व राष्ट्र निर्माणासाठीच्या केलेल्या कार्याची व योगदानाची निरपेक्ष चर्चा करण्याची गरज आहे. काहींनी निर्माण करून दिलेले किंवा असलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी बाबासाहेब वाचण्याची, समजण्याची आवश्यकता आहे. जयंती या उद्धेशाने साजरी झाली पाहिजे.

आपली निष्ठा असली, उद्देश चांगला असला की असे उपक्रम होत असतात. परिसराच्या प्रमुखावर व त्यांचे दृष्टीकोणावर अवलंबून असते. असे विचार डॉ आदर्श भालेराव यांनी व्यक्त केले. सदर १४ एप्रिल २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नवीन विचारांची अभिवादन ठरेल ज्यामुळे जयंतीच्या माध्यमातून अनेक दिन दुबल्या सामाज्यातीळ।नागरिकाला योग्य लाभ मिळण्यास मदत होईल

उपक्रमासाठी 10 कार्यक्रम निवडले :-

1) आरोग्यशिबिर दुर्बल घटकातील नागरिकांना रोग मुक्त समाज घडविण्याचा ध्यास 
2) विध्यार्थ्यांसाठी चित्रकला, महापुरुष निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा
3) वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य कार्यक्रम
4) महिला साठी हळदी कुंकू संगीत कार्यक्रम
5) महापुरुषांचे जीवन व कार्य याचे वाचन व कथन
6) सर्वांगीण विकास कार्यक्रम, योजनांचे सादरीकरण व त्यावर चर्चा, प्रशासन नीतिमान व शोषणविरहित सूचना
7) मी कसा घडलो, याबाबत कर्मचारी अधिकारी यांचे कथन
8) समाजासाठी योगदान यावर सादरीकरण, भविष्यातील संकल्प- निर्धार
9) बेरोजगारी वर मात करून आपलं भविष्य उज्वल घडविणाऱ्या महिला पुरुष याचा व्याख्यान
10 ) पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती साजरा करण्यासठी योगदान देणाऱ्या दनशूरचा सत्कार कार्यक्रम 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही समाजातील शोषित वंचित कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचे दाखले नाहीत, दाखले नाहीत म्हणून योजनांचा लाभ मिळत नाही, जागेच्या मालकी हक्काचे पट्टे नाहीत, योजना आहेत पण पक्के घर नाही, शिक्षण, आरोग्य, उपजीविका, रोजगार, सुरक्षा, सन्मानपूर्वक जीवन असे प्रश्न खूप आहेत. ह्याचे पूर्व नियोजन करून, १४ एप्रिल ला लाभ मिळवून देण्याची जयंती साजरी करता येऊ शकते.

डॉ. आंबेडकर जयंतीचा उपक्रम, शासकीय योजनेचा अभ्यास, विकासाचा ध्यास मनात निर्माण करून येत्या १४ एप्रिल च्या निमित्ताने "वाल्मिकी आंबडेकर आवास योजना, कचोरे" कल्याण पूर्व परिसरात विवीध उपक्रम राबवून समाज जागृत करण्यासठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कचोरे वतीने घेण्यात येणार आहे. असे मत डॉ. आदर्श भालेराव यांनी मांडले आहे. ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. आदर्श भालेराव, गंगाराम भालेराव, नितीन देशमाने, अजय वाव्हळे, अक्षय वाघ, अनिकेत भालेराव, अमित भालेराव कुलदीप मोरे, अंकुश चिंनानुर, सुनील माने, सुरेश वाघ, भीमराव भालेराव, दीपक देशमाने, संदीप गव्हाणे, सुमित भालेराव, सुनील कनकुटे, गौतम काउत्कर व इत्यादी समन्वयक यांनी पुढाकार घेतला आहे. २०२२ ची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाज्याला प्रेरणादायी ठरणार आहे .

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...