Tuesday, 5 April 2022

कल्याण तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा 'ठणठणाट, स्वच्छतेचे तीनतेरा, पाणपोई कोरडी, डझनभर लोकप्रतिनिधीचा पंचनामा?

कल्याण तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा 'ठणठणाट, स्वच्छतेचे तीनतेरा, पाणपोई कोरडी, डझनभर लोकप्रतिनिधीचा पंचनामा?


कल्याण, (संजय कांबळे) : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान वाढत आहे. अशातच उष्माघाताची भिती व्यक्त केली जातेय, राज्यात याचे ३ बळी गेले आहेत. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे या बाबत काही मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. असे असताना कल्याण तहसील कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असून समोरच असलेली पाणपोई केव्हाच कोरडी पडलेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या कार्यालयाशी डझनभर लोकप्रतिनिधींचा या ना त्या कारणांमुळे संबंध येत असताना नागरिकांना मात्र विविध अडचणीचा 'सामना' करावा लागतो आहे.


कल्याण तहसीलदार कार्यालय हे सर्वसाधारणपणे ब्रिटिश काळातील आहे असे बांधकामावरुन दिसून येते. कल्याण जंक्शन, एसटी आगार, न्यायालय,पंचायत समिती, महापालिका रुक्मिणी बाई रुग्णालय आदीमुळे गावोगावचे लोक त्यांच्या विविध शासकीय, खाजगी कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये जा करत असतात. तसेच कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल, सहाय्यक, लिपिक, शिपाई, पुरवठा ,संजय गांधी, अभिलेख कक्ष, सेतू, टपाल, कोषागार, इत्यादी कार्यालयात सतत वर्दळ असते. दररोज हजारो नागरिकांचा राबता असतानाही कल्याण तहसील कार्यालय परिसरात सुविधांचा अभाव दिसून येतो. पाणी व शौचालयाची पुरती गैरसोय आहे. यामुळे महिलांसह पुरुषांची मोठी कुचंबणा होत आहे. मुतारीचे सांडपाणी उघड्यावर बिगरशेती कार्यालयात समोरच जमा होत असल्याने येथून नाक बंद करून जावे लागते.त्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याचे स्पष्ट दिसते.


कल्याण तहसील कार्यालय अंतर्गत १२४ महसुली गावे, २९ तलाठी सजा, ७ मंडळ अधिकारी याचा समावेश होतो. लाखोंचा महसूल जमा करणारे या कार्यालयाकडून नागरिकांना सोईसुविधा मिळाव्यात म्हणून तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी २००५/६ मध्ये रोटरी क्लब आँफ कल्याण यांच्या सौजन्याने कै. सौ. सिंधू मार्तंड कुलकर्णी व कै. शशिकला वामन गाजरे यांच्या स्मरणार्थ पाणपोई सुरू करण्यात आली. परंतु कालांतराने याचे नळ केव्हाच कोरडे हौऊन गायब ही झाले. त्यामुळे सध्या ना पाणी, ना शौचालय, ना निवारा अशी अवस्था येथील झाली आहे.


या कार्यालयाशी सुमारे डझनभर लोकप्रतिनिधींचा या ना त्या कारणांमुळे संबंध येतो. मुरबाड मतदार संघ, कल्याण पुर्व-पश्चिम, डोंबिवली पुर्व पश्चिम, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, आदी क्षेत्रातील आमदार, खासदार, राज्य मंत्री, झेडपी अध्यक्ष, सभापती, विविध पक्षांचे अध्यक्ष, असे कितीतरी लोकप्रतिनिधी असताना लोकांना मात्र साध्या पिण्याच्या पाण्या सारख्या मुलभूत सोईसुविधा मिळू नये याला काय म्हणावे?

*प्रतिक्रिया

'अडचणी आहेत, आम्ही आमच्या स्तरावरून प्रयत्न करतो आहे, येत्या ७/८ दिवसांत पाण्याची सोय होईल,-जयराज देशमुख, तहसीलदार, कल्याण.

*तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तथापि मामलेदार यांच्या कडील महसुली सुनावणी करीता नागरिकांचे वकील प्रतिनिधी म्हणून आम्ही कार्यालयात येतो. येथे मोठी गैरसोय आहे, ती नेहमी निदर्शनास येते,-अँड. मनोज सुरोशे, कल्याण.


No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...