Friday, 22 April 2022

ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ च्या 'श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, लोकार्पण सोहळा संपन्न !

ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ च्या 'श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, लोकार्पण सोहळा संपन्न !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आदर्श गाव व आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ च्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व 'आम्ही जांभूळकर, या सेल्फी पाँईट चे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आणि सुभाष पिसाळ, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले.


या अतिशय सुंदर व देखण्या कार्यक्रमास महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे, प्रभाकर सरकटे, इंजिनिअर मुंबई, अरुण कटाळे, कार्यकारी अभियंता म ओ वि महामंडळ, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळचे सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ, उपसरपंच ज्योती जाधव, सदस्या सुनिता गोरे, सुमन पिसाळ, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अक्षय सांवत, राजाराम मुकणे, अशोक शिंदे, ग्रामसेविका बी यू कोकणे, माझी सरपंच, नरेश गायकवाड ,वसद गावचे माझी सरपंच जाधव मँडम, रविंद्र भोईर, जांभूळ सेवा सोसायटीचे चेअरमन सत्य विजय पिसाळ, उदयोजक, भगवान पिसाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रास्ताविक करताना सरपंच परिक्षित पिसाळ यांनी सांगितले की, प्रत्येक गावागावात पक्ष भेद, वंश भेद, जातीपाती यातून होणारे राजकारण आणि या सर्वामुळे गावाचा विकास होत नाही, त्यामुळे हे टाळण्यासाठी प्रथम माझे गाव व नंतर पक्ष,जात भेद यासाठी 'आम्ही जांभूळकर, ही संकल्पना मांडली, असे सांगून गावात ६०/७० टक्के जलजीवन मिशन अंतर्गत चे कामे झाली असून सर्वांना मीटर बसवून दिले आहे. भविष्यात अजूनही अधिक कामे करायची आहेत असे ही त्यांनी सांगितले.


तर आमदार किसन कथोरे आपल्या भाषणात म्हणाले, आज उद्घाटन झालेल्या दोन्ही वास्तू भव्यदिव्य अशा आहेत, गावात प्रवेश करताना श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराजवळ माथा टेकवून च आपण प्रवेश केला जाणार, असे सांगून ज्या गावात जातपात विरहित असे सरपंच असतील तर गावाचा विकास होणारच, जांभूळ हे गाव जिल्हा, राज्य नव्हे तर केंद्रात चमकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, हे गाव पालिकेत जाईल, नगरपालिका होईल हे माहित नाही, पण हे गाव राहील, व ते अंबरनाथ तालुक्यात असावे असे मला वाटत असेही ते म्हणाले, गावाच्या जवळपास रेल्वे स्टेशन, मेट्रो यतेय त्याचा फायदा गावाला होईल असे पाहावे, असा सल्ला यावेळी आ. कथोरे यांनी दिला. यावेळी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


*सरपंच, परिक्षित पिसाळ- भावूक -जांभूळ या परिसराचे जेष्ठ नेते सुभाष पिसाळ (नाना) यांनी तब्येत ठिक नसतानाही आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, इतकेच नव्हे तर, मला बोलायचे आहे म्हणून माईक घेतला, नेता पुढारी, कसा असावा, यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनातील एक प्रंसग सांगितला, तसेच मी आपणा सर्वांचे प्रेमामुळेच दुर्धर आजारातून वाचलो आहे असे सांगताच, सरपंच परिक्षित पिसाळ यांचे डोळे पानावले, त्यांचे अश्रू अनावर झाले, ते हे लपवण्याचा प्रयत्न करीत होते पण ते लपून राहिले नाही.


ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ च्या या अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक बाळू कोकणे, ग्रामपंचायत कर्मचारी राजन साटम, महेश आयरेकर, नामदेव जाधव, निलेश आयरेकर, आणि ग्रामस्थांनी मेहणत घेतली.

या देखण्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश ठाकूर यांनी केले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...