संजय शांताराम तावडे यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वे व्यवस्थापन विभागात ३१ वर्षे नोकरीत असलेले, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्थानिय लोकाधिकार समितीचे चिटणीस व मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकार पतपेढीचे संचालक व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धामणपेचे सुपुत्र, श्री.संजय शांताराम तावडे यांना २०१९-२०२० चा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाला. कामगार मंत्री, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी स्टेशन जवळ येथे संपन्न झाला. २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ५१ कामगारांना दरवर्षी गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करते. श्री. संजय शांताराम तावडे यांनी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना व महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेचा प्रचार आणि कामगार शिक्षण या क्षेत्रांत व कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक उपक्रम हाती घेऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झाला.
श्री. संजय शांताराम तावडे यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर स्थानिय लोकाधिकार समिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर कार्याध्यक्ष नंदू राणे, संजय माधव, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट मजदूर संघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, प्रविण मंचेकर, सुधीर तिवरेकर डॉ.आमदार राजन साळवी, आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, जेष्ठ तरूण उद्योजक सचिनभाऊ घुमरे, समाजसेवक संतोष नार्वेकर, कोकण महोत्सवाचे सर्वेसर्वा सुजय धुरत, उद्योजक दीपक म्हसकर, बंधुत्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समिर राणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील धामपणे ग्राम विकास मंडळ, सर्वोदय शिवगणेश सह. गृहनिर्माण संस्था व विभागातील रहिवासी मंडळ, निष्ठावंत प्रतिष्ठान, श्री दत्तगुरू सेवा मंडळ धामनपे यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व कौतुकास्पद कामगिरी बाबत अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment