कल्याण पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीतील "खरे गद्दार" कोण? माजी उपसभापती सवाल !
कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात सध्या शिवसेना भाजप यांच्यात विस्तव जात नसताना, माविका आघाडीतील विविध मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनाची टांगती तलवार असताना ही कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे बहुमत होत असताना कमी सदस्य असलेल्या भाजपाचा सदस्य सभापती म्हणून बिनविरोध निवडून येतात, मग यांच्यात खरे गद्दार कोण? कोण कितीला विकला गेला?घोडेबाजार कोणी केला असा संतप्त सवाल कल्याण पंचायत समितीचे माझी उपसभापती किरन ठोंबरे यांनी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कल्याण तालुका पंचायत समितीवर तसे पाहिले तर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हायला काही हरकत नव्हती. कारण शिवसेना ४ राष्ट्रवादी ३ आणि भाजपा ५ असे पक्षीय बलाबल होते. परंतु गेल्या दोन टर्म भाजपाने सभापती व उसभापतीपदी धडक मारली होती, यावर प्रामुख्याने मुरबाडचे आ. किसन कथोरे यांचे प्राबल्य दिसून आले होते, परंतु आता शिवसेनेच्या सभापती अनिता वाघचौरे व उपसभापती रमेश बांगर हे विराजमान झाले होते. परंतु ठरलेल्या काळात रमेश बांगर यांनी राजीनामा न दिल्याचा आरोप करत एकूण १२ सदस्यांपैकी तब्बल. १० सदस्यांना घेऊन बांगर यांच्या वर सदस्य किरण ठोंबरे यांनी ऐतिहासिक अविश्वास ठराव आणला होता व तो मंजूर ही झाला होता.
यानंतर रिक्त झालेल्या उपसभापती च्या निवडणुकीत किरण ठोंबरे यांनी भाजपच्या मदतीने उपसभापती पद मिळवले होते. यावेळी शिवसेनेचे रमेश बांगर यांनी तक्रार ही केली होती, शिवाय पक्षीय व्हिप देखील काढला होता. यावेळी ठोंबरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याची टीका देखील झाली होती. बांगर यांच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे सुनावणी होऊन ५/६ महिन्यानंतर ठोंबरे यांचे पद रद्द करण्यात आले होते. यावेळी झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे भरत भोईर यांची बिनविरोध निवड झाली, यावेळी शिवसेनेच्या अनेकांनी ठोंबरे यांच्या वर जहरी टिका केली होती. परंतु ठोंबरे यांनी आपल्या कार्यकाळात कार्यालय स्व:खर्चाने बनवून घेतले होते. तसेच प्रशासनावर वचक निर्माण केली होती. कल्याण पंचायत समितीच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांचे प्रश्न, अडचणी, समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक ही झाले होते.
आता नुकतीच कल्याण पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती अनिता वाघचौरे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदी भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती बिनविरोध निवड झाली. नेमका हाच धागा पकडून माझी उपसभापती किरण ठोंबरे यांनी काही प्रश्न उपस्थित करून गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणने आहे की, कल्याण पंचायत समिती मध्ये शिवसेना ३, राष्ट्रवादी ३ आणि भाजप ५ असे सध्या पक्षीय बलाबल आहे, बहुमत महाविकास आघाडीकडे असताना कमी सदस्य संख्या असलेल्या भाजपाला सभापती पद कसे मिळाले?आता गद्दारी कोणी केली, खरे गद्दार कोण? कोण विकले गेले, घोडेबाजार कोणी कोणाशी केला? आता पक्षीय व्हिप कुठे गेला, तो गद्दाराविरोधात काढणार आहे का?असे विविध प्रकारचे प्रश्न किरण ठोंबरे यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच आपण लवकरच वरीष्ठांना भेटणार असून हा प्रकार सांगणार आहे. असेही ते म्हणाले.




No comments:
Post a Comment