Monday, 4 April 2022

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या टिकेनंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरी !!

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या टिकेनंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरी !!


भिवंडी, दिं,४, अरुण पाटील (कोपर) :
             महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणामुळे चर्चेत आहेत. या भाषणामध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. शिवसेनेवरील टीकेसोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष असल्याचाही आरोप त्यांनी शरद पवारानचे नाव घेत केला होता.
             राज ठाकरे सातत्याने आपल्या भूमिका बदलत असून आता त्यांनी हिंदुत्वाला पुरक अर्थात भाजपच्या सोयीची भूमिका घेतली असल्याची विरोधकांकडून टीका केली जात आहे. एकीकडे हे सगळं सुरु असतानाच काल रविवारी रात्री राज ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली आहे.
           गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मनसे मेळाव्यामध्ये तुफान फटकेबाजी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास गडकरी ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी पोहोचले होते.
        एकीकडे महाविकास आघाडीवर सडकून टीका आणि दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरींची भेट या साऱ्या घडामोडींमुळे भाजप आणि मनसे या दोन पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, गडकरींनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या दोहोंमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली असली तरी ही भेट निव्वळ वैयक्तीत असल्याचं गडकरींनी सांगितलंय. कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू या भेटीमागे नव्हता, असं त्यांनी स्पष्ट सांगितंलय.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...