धरणाच्या पाण्यात घरे बुडालेल्या "अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या" देधडक-बेधडक आंदोलनाची वैभववाडीच्या 'तहसिलदार संजीता महापात्र (भाप्रसे)' यांनी घेतली दखल !!
*ऊद्या मंगळवारी ५ मार्च २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जलसंपदा अधिकार्यां समवेत तातडीची बैठक*
वैभववाडी,बातमीदार : अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि स्थलांतर न करता बेकायदेशीर घळभरणी करुन धरणात पाणीसाठा केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. तब्बल चार वर्षा नंतर मार्च २०२२ मध्ये ही घरे धरणाच्या पाण्याबाहेर आलेली आहेत. या घरांची पहाणी करण्यासाठी तातडीने गावात भेट द्यावी, बुडालेल्या घरांचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणी साठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी वैभववाडी तहसील कार्यालया वर देधडक- बेधडक आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेऊन ऊद्या मंगळवारी ५ मार्च २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक आयोजीत केली आहे.
तत्कालीन जिल्हाधीकारी पांढरपट्टे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कार्यकारी अभियंता राजन डवरी या अधिकाऱ्यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही पुनर्वसन व स्थलांतर न करता अधिकाराचा गैरवापर आणि महाराष्ट प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन आधिनीयम १९९९ हा कायदा धाब्यावर बसवुन प्रकल्पाची घळभरणी केल्याने प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० रहाती घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. असे असताना अरुणा प्रकल्पात एक ही घर बुडालेली नाही असे खोटे अहवाल
तत्कालीन जिल्हाधीकारी पांढरपट्टे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसीलदार वैभववाडी, तलाठी, पोलीस पाटील आखवणे यांनी सादर केले. या विरोधात गेली चार वर्ष लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेच्या वतीने शेकडो अर्ज व आंदोलने केली आहेत. परंतु खोट्या अहवालाच्या आधारे घरे बुडालीच नाहीत असा दावा करणारे डवरी, जोशी,पांढरपट्टे, तहसीलदार तलाठी, पोलीस पाटील यांचा दावा खोटा ठरला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच डवरी, जोशी, पांढरपट्टे, या अधिकाऱ्यांनी बदल्या करुन जिल्ह्यातुन पळ काढला.
जलसंपदा विभागाच्या नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मार्च २०२२ मध्ये तब्बल चार वर्षा नंतर धरणाच्या पाण्यात बुडालेली शेकडे घरे बाहेर आली आहेत. या घरांचा तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटना आक्रमक झाली आहे. बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी देधडक-बेधडक आर्कोश आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधीकारी वैभववाडी यांची लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे तानाजी कांबळे अध्यक्ष, अजय नागप सेक्रेटरी, हिरालाल गुरव उपाध्यक्ष यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची ५ एप्रिल २०२२२ दुपारी १२:३० वाजता तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने तानाजी कांबळे अध्यक्ष,अजय नागप सेक्रेटरी, हिरालाल गुरव उपाध्यक्ष,अशोक बांद्रे, अनंत नागप, विलास कदम, प्रकाश सावंत, विजय भालेकर, अनंत मोरे, सुरेश जाधव आदी पदाधीकारी या बैठकीस उपस्थित रहणार आहेत.

No comments:
Post a Comment