Monday, 4 April 2022

भिवंडीतील चौघुले विधी महाविद्यालयात "लॉ" चे शिक्षण पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान !! "वकील जबाबदारी चा व्यवसाय – गजानन चव्हाण"

भिवंडीतील चौघुले विधी महाविद्यालयात "लॉ" चे शिक्षण पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान !!
"वकील जबाबदारी चा व्यवसाय – गजानन चव्हाण"


भिवंडी, दिं,४, अरुण पाटील (कोपर) :
        भिवंडी शहरातील अंजुर फाटा येथील श्री इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय "विधी" कायदा (लॉ ) चे शिक्षण पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र (दीक्षांत) प्रदान करण्याचा कार्यक्रम  मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष गजानन चव्हाण, माजी अध्यक्ष अँड. प्रमोद पाटील, ठाणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम, अँड विकास जोशी, चौघुले महाविद्यालयाचे अध्यक्ष इंन्‍द्रपाल चौघुले, सुभाष चौघुले विधी महाविद्यालय प्राचार्य अनिल गायकवाड, ॲड.स्वप्नील पाटील अँड, फैय्याज शेख, विश्वस्थ हरिश्चंद्र चौघुले, शाम चौघुले प्राचार्य विनायक दहिवले, अँड यु.के नांबियार अदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        वकील हा जबाबदारी ही भूमिका बजावणारा व्यवसाय आहे. याकडे धंदा म्हणून कोणी  पाहू नये, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नवीन वकिल विद्यार्थ्यांनी विशेष करून प्रयत्न करावे असे आवाहन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी यावेळी केले. नवोदित वकिलांनी वकील व्यवसायाचे चांगले शिक्षण मिळावे म्हणून लवकरच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचेच्या वतीने प्रशिक्षणाचा अधिकृत कार्यक्रमही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
         वकिली व्यवसाय करण्यासाठी चांगली प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे. पक्षकारांस न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे नवोदित विद्यार्थी वकिलांनी तज्ञ जेष्ठ वकिलांकडून शिक्षण माहिती घेऊन कायद्याचे ज्ञान आत्मसात करून आपली प्रगती करावी असे आवाहन ज्येष्ठ वकील अँड. प्रमोद पाटील यांनी केले. वकिली व्यवसायात प्रामाणिकपणा, सचोटी व कष्ट घेतल्यास चांगली प्रगती होत असते या कामात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची संधी असते त्यामुळे प्रत्येकाने कायद्याचा चांगला अभ्यास करून वकिली करावी असे आवाहन ठाणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली.      
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल गायकवाड व चौघुले महाविद्यालयाचे इंन्‍द्रपाल चौघुले यांनी करून कॉलेज विधी महाविद्यालय ची संपूर्ण माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पाहुण्यांचा हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रम अनुषंगाने विद्यार्थी साठी कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या त्यात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचि सुध्दा गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन विठ्ठल दिवेकर, कैकशा लोनबाल यांनी तर आभार प्रदर्शन इंद्रपाल चौघुले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...