Monday, 4 April 2022

माऊली आरंभ सो.सा.तर्फे श्री सत्यनारायण पूजा कार्यक्रम संपन्न !!

माऊली आरंभ सो.सा.तर्फे श्री सत्यनारायण पूजा कार्यक्रम संपन्न !!


मुंबई - (दिपक कारकर) :

डोंबिवली पूर्व येथील मानपाडा परिसरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या माऊली आरंभ सोसायटीची श्री सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम नुकताच रविवार दि. ०४ एप्रिल २०२२ रोजी उत्साहात पार पडला.या सोहळ्याला डोंबिवली मधील प्रसिद्ध उद्योजक दिलीपशेठ वझे आणि हरीषशेठ वझे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली, तद्नंतर विविध प्रकारच्या गाण्यावर मुलांनी सुंदर असे कलानृत्य सादर केले. माऊली परिवाराने या कार्यक्रमाला अतिशय चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर आलेले प्रमुख पाहुणे आणि माऊली परिवार यांनी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. अखेरीस आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची झाली सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास माऊली आरंभ सोसायटीचे सचिव संजय अहिरे, खजिनदार रोशन जाधव, अभिजीत लांडे, अक्षय मोरे, रोहन महाडिक, प्रथमेश सणस, राकेश कदम, अनिकेत लांडे, सूरज मित्तल ,संदीप पाटील, किरण पाटील ,देवा कोचले, दीपक गवरे, प्रताप त्रिकाळ, राज अहिरे आणि सर्व माऊली परिवार या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या पूजेकरिता देणगी आणि जेवणाची सामग्री सूरज मित्तल, नागनाथ गिरी, अभिजीत लांडे, अनिकेत लांडे, देवा कोचल, विठ्ठल सणस, आणि गायत्री शर्मा यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संजय डांगे यांनी केले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...