Monday, 4 April 2022

हेल्मेट जनजागृती रॅली; नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन !!

हेल्मेट जनजागृती रॅली;  नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन !!


बुलडाणा, बातमीदार, दि. ४ : नागरीक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याकरिता व्यापक स्वरुपात हेल्मेट संबधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी  एस. राममूर्ती यांचेकडुन रॅलीस हिरवा झेडा दाखविण्यात आला. 


तसेच सेल्फी पॉईट वर फोटो काढुन हेल्मेट बाबत जन जागृती करण्यात आली. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभ चौक, धाड नाका, सरकुलर रोड, चिखली रोड, भोडे चौक, बाजार लाईन मार्गे काढण्यात आली. रॅली चा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा येथे समारोप करण्यात आला. 


त्याच प्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आज ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेले नागरीक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार तसेच बुलडाणा शहर पोलिस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांनी परिवहन कार्यालयात कामकाज निमीत आलेल्या नागरीक व कार्यालयीन कर्मचारी यांना प्रबोधन केले. 

वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसुन आले आहे. या बाबत हेल्मेट वापरण्यासंबधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी संबधी व्यापक जनजागृती करीता संपुर्ण शहरामध्ये हेल्मेट रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये परिवहन विभाग अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, वाहन वितरक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...