Saturday, 9 July 2022

बायोमेट्रिक झालेल्या क.डो.म.पा क्षेत्रातील 70 पेक्ष्या जास्त झोपडपट्टी वासियांना BSUP योजनेत प्रहार घरकुल मिळवून देणार- डॉ आदर्श भालेराव

बायोमेट्रिक झालेल्या क.डो.म.पा क्षेत्रातील 70 पेक्ष्या जास्त झोपडपट्टी वासियांना BSUP योजनेत प्रहार घरकुल मिळवून देणार- डॉ आदर्श भालेराव 


कल्याण, बातमीदार : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरविणे, या उप कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासनाने २००७ मध्ये शासन निर्णय काढले होते. या कार्यक्रमाचा कालावधी सन २००५-२००६ पासून सात वर्ष कालावधीत कल्याण क्षेत्रातील झोपडपट्टी वासियांचे मूलभूत सुविधा उपलब्ध करून घरकुल निर्माण करून पुनर्वसन करण्याचे अभियान राबवण्यात आले होते. शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरवणे या उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट होता. झोपडपट्ट्यांच्या एकात्मिकृत विकास म्हणजे निवडलेल्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा सहित निवार उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प, शहरी गरिबांसाठी मूलभूत सुविधाचा विकास देखभाल अंतर्भूत असलेले प्रकल्प, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन प्रकल्प, पाणीपुरवठा गटारे मलनिसारण सार्वजनिक स्नानगृहे ,स्वच्छता गृह इत्यादी प्रकल्प, झोपडपट्टी धारक शहरी गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना परवडतील अशी घरे बांधण्याचा प्रकल्प, गटारे पावसाळी गटाराचे बांधकाम सुधारणा, झोपडपट्ट्यातील पर्यावरणात सुधारणा घन कचऱ्याचे व्यवस्थापन, रस्त्यावरील विद्युत दिवे, नागरी सुविधा समाज केंद्र बालसंगोपन केंद्र, शहरी गरिबांसाठी असलेल्या आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षा अशा योजना एककेंद्रकाभिमुख करणे, असे अनेक उपक्रम राज्य व केंद्राच्या महा पालिके माध्यमातून राबवले गेले होते. या उप कार्यक्रमासाठी केंद्र शासनाने देशातील एकूण 63 शहराची निवड केली होती. व विविध अभियानाच्या उद्दिष्टाच्या पूर्तेते साठी राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लाभार्थ्याला मोफत घर देण्यात येऊ नये. अ.जा/ अ. ज/ मागासवर्गीय/ इ .मा .व/ शा अपंग आणि इतर कमकुवत घटक यांना 10% इतकेही तर उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातील घटकांना 12 टक्के इतके रक्कम अंशदान म्हणून भरावी लागेल असेही नमूद केले होते. या उप कार्यक्रमाचे अंमलबजावणी करिता सी आर झेड / एन डी झेड व अन्य आरक्षणामुळे बाधित झालेल्या भूखंडावर जेथे झोपड्या पट्ट्या आहेत तेथे मूलभूत सुविधा पुरविण्याचे प्रकल्प घेण्यात यावे तर अन्य भूखंडावरील झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याचे तसेच गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात यावे. महानगरपालिकांनी त्यांच्या काळी शेतातील झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवठा तसेच मधील पाचही नागरिक समूहाच्या क्षेत्रामध्ये गृहनिर्माण प्रकल्प महाडााने राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे असेही स्पष्ट नमूद केले होते. निवासी झोपडधारकांना किमान 269 चौ. फु. बांधकाम क्षेत्रफळ इतका(225 चौ.फु. चटई क्षेत्र) गाळा देण्यात येईल असे स्पष्ट नमूद होते. अनिवासी व्यावसायिक झोपडीधारकांना त्याच्या भोगट ठेवा खालील क्षेत्रफळा इतका परंतु तू 269 चौरस फूट इतक्या अधिकतम बांधकामा क्षेत्रफळाच्या 225 चौरस फूट चटइ ) क्षेत्रफळ मर्यादेस अधीन राहून देण्यात येईल असे नमूद केले होते. त्यानुसार महा पालिका क्षेत्रातील झोपडपट्टी सुधारना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 70 पेक्षा जास्त झोपडपट्टीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत शासनाच्या धोरणा नुसार ( Bio metric/ IRIS बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे बंधनकारक होते त्यामुळे बायोमेट्रिक करण्यात आले होते. त्याप्रमाणे खालीलपैकी झोपडपट्टींमध्ये बायोमेट्रिक करण्यात आले होते.


 १.कचोरे पत्रिपुल , 2.कचोरे गाव, .3.नेतीवली टेकडी , 4.संतोषी माता रोड 5.आनंदनगर भाग पत्रिपुल , 6.सूचक नाका 7. गणेश नगर 8.पत्रिपुल,नेतीवली खदान 9. ,गोविंदवाडी(A, B, C,) 10.उंबर्डे 11.अण्णा नगर, 12.महात्मा फुले नगर 13. आंबिवली जेतवन नगर 14.रामजी नगर, 15. सम्राट अशोक सोसायटी, आंबिवली 16. गलेगाव अंबिवली, 17.तक्षशीला नगर,18. लहुजींनागर, 19. तिप्पनना नगर आंबिवली, 20.इंदिरा नगर मांडा टिटवाळा, 21. धम्मदिप नगर,, 22.काळा तलाव शिवमंदिर 23.कॉलिटी कंपनी 24.महात्मा फुले चौक तहसीलदार, 25.सिंडी केट नगर , 26 आय डी आय शहाड, 27.ताडवाडी, 28. रामनगर कल्याण, 29.काळा तलाव मकबरा, 30.इंदिरा नगर ( A,B,C,D,E,F, सेक्टर कल्याण) 31.शिवाजी नगर वालधुनी, 32.अशोक नगर वालधुनी, 33.दत्त परिसर शिवाजी नगर वालधुनी, 34. सिद्धार्थ नगर 35. आनंद वाडी काटेमानिवली 36.लक्ष्मीबाई बाग 37.दुर्गामाता रोड, कल्याण पूर्व , 38 विनायक कॉलनी खडे गोलवली, 39.साईनाथ कॉलनी , 40.आंबेडकर नगर 41.साठेनगर, डंपिंग 42.रामनगर कल्याण 43. मिलिंद नगर , 44. भवानी निवास 45.इंदिरा नगर ,46. डीपी रोड ,47.कातकर वाडी, 48.समाधान वाडी 49.,त्रिमूर्ती नगर एल सेक्टर , 50. ज्योती नगर 51.समता नगर 52.सुनील नगर 53.डी एन सी रोड 54.सिध्दार्थ नगर 55.महात्मा फुले नगर 56.राहुल नगर ,दत्तनगर ( ABCD) 57.जय बजरंग 58.शांती नगर 59.शिवाजी नगर हट मेंट 60साईनाथ नगर आयरे 61.आदर्श नगर ,62. सहकार नगर 63.संतवाडी ,64 म्हसोबा नगर 65. हनुमान नगर, 66.हरिजन निवास, 67.बंजारा वस्ती डोंबिवली वरील उप कार्यक्रमात एखाद्या झोपडी मध्ये मूलभूत सुविधा अधिक गृहनिर्माण असा एकत्रित प्रकल्प हाती घेऊन झोपडपट्टीचा पूर्ण विकास करण्यात आला असेल तर प्रकल्प पूर्ण झाल्यापासून एक महिन्याच्या आत त्याचे झोपडपट्टी अस्तित्वात नसल्याचे घोषित करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्त मुख्य अधिकारी यांची व्यक्तिगत जबाबदारी असेल मात्र निवड मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर वरील प्रमाणे कार्यवाही करण्याची गरज नाही या उप कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता नवीन झोपडपट्टी तयार होणार नाही याची सुकाणू अभिकरणाने दक्षता घ्यावी असे नमूद केले होते. सदर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अंतर्गत (BSUP) प्रकल्प राबविण्यात आले होते. महापालिकेने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्वस्थान अभियाना अंतर्गत 2005 ते 2022 पर्यंत रस्ता रुंदीकरणात निष्काशीत झालेल्या 2044 नागरिकांना पैकी 1525 झोपडी धारकांना लाभार्थी हिस्सा महापालिका फंडात जमा करून घेतला आहे.. याव्यतिरिक्त कोणत्याही झोपडपट्टी धारकांना बीएसयुपी योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचे मोहीम हाती घेण्यात आलेले नाही किंवा कल्याण नमुने महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षण अन्वये कोणालाही बीएसपी योजनेत घर देण्यात आले नाही याचा खुलासा प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांनी सन 2020 मध्ये उघडीस आणला. व सदर 70 पेक्षा जास्त झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन बी एस यु पी योजनेत करणे बंधनकारक असताना देखील महापालिकेने हजारो नागरिकांना घरापासून वंचित ठेवले आहे. केंद्र राज्य व महापालिका निधीतून निर्माण झालेले BSUP प्रकल्प केवळ महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांच्या हक्काचे घर असताना देखील गेली दहा वर्षापासून महापालिकेने BSUP प्रकल्प रखडवले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात निर्माण झालेले बीएसपी प्रकल्प झोपडपट्टी धारकांचे हक्काचे घर असताना देखील महापालिका बीएसयुपी समिती 70 पेक्षा जास्त झोपडपट्टी वासीयांच्या मूलभूत अधिकाराचे हनन करत आहेत. हे बाब प्रहार ने उघडीस आणले आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांनी महा पालिका क्षेत्रातील BSUP योजनेत प्रत्येक झोपडी धारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी मोहीम हाती घेतले आहे.   

             ( डॉक्टर आदर्श भालेराव)

प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख हितेश जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष एड स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव याच्या प्रयत्नानाने पुढाकार घेऊन मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झोपडपट्टी धारकाने आपले हक्काचे घर मिळावे यासाठी प्रहार कडे बायोमेट्रिक झालेली पावती घेऊन संपर्क साधावा. सन 2008 मध्ये महापालिका क्षेत्रात बायोमेट्रिक झालेल्या झोपडपट्टी धारकांना प्रहार च्या प्रयत्नाने BSUP योजने पुनर्वसन करण्यासाठी नगर रचना विभागाचे BSUP लाभार्थीं निवड समितीला आदेश दिले आहे . महा पालिका क्षेत्रात झालेल्या बायोमेट्रिक वरील झोपडपट्टी धारकांची नावे मानवी अन्याय निर्मूलन संघटना, प्रहार कडे उपलब्ध असल्याने नागरिकांनी संपर्क साधावा ह्या नंबर संपर्क करावा 8070705552 अशी माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...