Wednesday, 6 July 2022

अनधिकृत गाळ्यांवर कारवाई होत नसल्याने मिलिंद जाधव यांचा उपोषणाचा इशारा !! *दुरुस्तीचे काम ततडीने थांबविण्याचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांचे लेखी आदेश*

अनधिकृत गाळ्यांवर कारवाई होत नसल्याने मिलिंद जाधव यांचा उपोषणाचा इशारा !!

 *दुरुस्तीचे काम ततडीने थांबविण्याचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांचे लेखी आदेश*



मोहोने, बातमीदार : मोहने येथील मुख्य बाजारपेठेतील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी महापालिका आयुक्त यांना उपोषणाचा इशारा दिला आहे.


          मोहने येथे मुख्य बाजारपेठेत प्रवीण गडा आणि अंजना पटेल यांनी पाच ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मिलिंद जाधव यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला असून कल्याण डोंबिवली आयुक्त, उपायुक्त अनधिकृत बांधकाम, सहाय्यक आयुक्त, यांच्याकडे तब्बल पाच वेळेस अनधिकृत बांधकामाची तक्रार केली आहे तरीही या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने मिलिंद जाधव यांनीअखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 
          ८ जून पासून मिलिंद जाधव हे पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करणार असून संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण उपोषण माघार घेणार नसल्याचे सांगितले आहे
           जाधव यांच्या उपोषणा बाबत सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना विचारले असता मोहने येथील मुख्य बाजारपेठेत प्रवीण गडा आणि अंजना पटेल यांच्या मालकीचे गाळे आहेत हे गाळे दुरुस्ती करिता प्रवीण गडा यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती काही अटी आणि शर्ती नुसार त्यांना गाळे दुरुस्तीची परवानगी दिली होती. परंतु प्रवीण गडा आणि अंजना पटेल यांनी गाळे दुरुस्ती न करता बेकायदेशीर राजरोसपणे कोबा प्रकार दाखवून स्लॅब टाकण्याचे काम केले. तसेच अनेक गाळ्यांची उंची वाढविली ही बाब मिलिंद जाधव यांनी गुप्ते यांच्या निदर्शनास आणून दिली. 
            त्यामुळे परवानगी मध्ये दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याने त्यांचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वाढीव बांधकाम केलेले गाळे कोणत्याही व्यक्तीस हस्तांतरित करू नये असे २४ जून रोजी प्रवीण गडा यांना लेखी कळविले आहे, असे गुप्ते यांनी सांगितले आहे.
            पालिकेने दुरुस्तीची परवानगी रद्द केली असली तरी आतमध्ये गाळे दुरुस्तीचे काम राजरोसपणे सुरू असल्याचे मिलिंद जाधव यांचे म्हणणे असून जोपर्यंत अनधिकृत गाळ्यांवर निष्कासणाची कारवाई होत नाही तसेच संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नसून येत्या आठ दिवसात अनधिकृत गाळ्यांवर कारवाई न झाल्यास पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे मिलिंद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...