Wednesday, 6 July 2022

मुंबई महानगर प्राधिकरणाच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र प्राधिकरणाची व्हावे - राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव

मुंबई महानगर प्राधिकरणाच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र प्राधिकरणाची व्हावे - राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव


कल्याण, बातमीदार : कल्याण येथील पत्रकार परिषदेत माजी सिडको अध्यक्ष व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून कल्याण व मुरबाड भागातील शहरी व ग्रामीण भागातील समस्यांकडे लक्ष वेधले यातील प्रमुख मागणी गेले २५ वर्ष प्रस्तावित असा मुरबाड रेल्वे मार्ग याला लागणारा खर्च ८०० कोटी यातील ४०० कोटीचा निधी मा. माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार अधिवेशनात प्रस्तावित केला आहे तो तात्काळ उपलब्ध करावा. तसेच मुंबई महानगर प्राधिकरणाच्या धर्तीवर ठाणे, कल्याण प्राधिकरण स्थापन करणे ज्याने इन्फ्रास्ट्रक्चर सामायिक सुविधा (रस्ते, ड्रेनेज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, घनकचरा, दळणवळण साधन, वाहतूक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, पार्किंग झोन, पाणी पुरवठा इ.) नियोजन करणे सोपे होईल.


कल्याण, मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंड्रस्ट्रीयल झोन सुरु करावा ज्याने युवती व महिलांना रोजगार उपलब्ध होईल.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आरक्षित जागेवर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे.

मुंबईतील बेस्ट प्रमाणे ठाणे जिल्ह्यात एक वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे ज्याने महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण परिसर यांना फायदा होईल व मुंबई मेट्रो रेल्वे जाळे जे कल्याण पर्यंत प्रस्तावित आहे तथापि कल्याण पुढील टिटवाळा, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर पर्यंत विस्तार करावा.

अशा विविध मागण्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी ठेवल्या व जिल्ह्य़ाला मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने आपल्या मागण्या मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुर्ण करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे प्रमोद हिदुराव - प्रदेश उपाध्यक्ष ; प्रसाद महाजन - प्रदेश सचिव ; रमेश हनुमंते - प्रदेश सरचिटणीस ; भरत गोंधळी - ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ; प्रविण खरात - प्रदेश चिटणीस ; दिनेश पटेल - व्यापारी सेल शहर सचिव ; प्रसाद सदलगे - जिल्हा उपाध्यक्ष ; रेखा सोनावणे - जिल्हा उपाध्यक्ष ; सुरय्या पटेल - जिल्हा उपाध्यक्ष ;अय्याज मौलवी - माजी नगरसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...