आम आदमी पार्टी कल्याण, डोंबिवली यांचा विज दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन !
कल्याण, बातमीदार : महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या नवनियुक्त सरकारने विजेच्या दरांत भरमसाठ वाढ करून जनतेला मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच गॅस दरवाढ व वाढलेल्या महागाई विरोधात आज आम आदमी पार्टी कल्याण, डोंबिवली यांनी महावितरण कार्यालय व तहसिलदार कार्यालय येथे आंदोलन केले.
आधीच केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईत होरपळलेल्या जनतेला महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या नवनियुक्त सरकारने विजेच्या दरांत भरमसाठ वाढ करून जनतेला मोठा आर्थिक झटका दिला आहे. आज दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असून तेथे २०० युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाते तर पंजाब मध्ये १ जुलै पासून ३०० युनिट वीज मोफत करण्यात आली आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त महागडी वीज महाराष्ट्रात आहे. गेले अडीच वर्ष वीज दरवाढीविरोधात आंदोलन केले व आता सत्तेवर आल्यानंतर लगेच वीज दरवाढ केली याचा आम्ही निषेध करत आहोत व नवनियुक्त सरकारने विज आकार बंद करा, नफाखोरी, सावकारी बंद करा तसेच २०० युनिट पर्यंत वीज मोफत द्या अशी मागणी आमची असल्याचे आम आदमी पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी सांगितले. महावितरण कार्यालय व तहसिलदार कार्यालय येथे निवेदन दिले.
यावेळी आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड तसेच संदीप नाईक, राजेश शेलार, रवी केदारे, रुपेश पाटील, सौ. निलिमा व्यवहारे, आमीर बेग, सचिन जोशी, प्रसाद कासोदेकर, समीर गांगुर्डे, निलम व्यवहारे, दानीश पठाण, झाकीर शेख, सुनील घोरपडे, राजु पांडे, उमेश कांबळे असे अनेक महिला, पुरुष पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment