Wednesday, 13 July 2022

जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी !

जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी !


कल्याण, बातमीदार : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन गायत्री पॅथॉलॉजी उल्हासनगर व उन्नती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कल्याण आयोजित संस्थापक अध्यक्ष आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी आणि अल्प दरात चष्मा शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे नेहमीच अनेक समाज उपयोगी कार्य करत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी परिवहन सभापती नगरसेवक नवीन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात बीपी, सीबीसी, सिरम क्रिएटिनिन, एस जिओ टी , सोडियम, ग्लुकोज, ग्लुकोज, पीपी, थायरॉईड, अशा अनेक तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या तसेच मोफत ऑपरेशन, हृदयाची शस्त्रक्रिया, अन्ननलिका, हाडांचे फॅक्चर, डोळ्याचा तिरळेपणा, अपेंडिक्स, मणक्याच्या, यकृताचा आजार, सांधेदुखी, डोळ्यातील सफेद पडद्याची दुरुस्ती, गर्भपिशवी दुरुस्ती, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे, कॅन्सर, मुतखडा, जिभेच्या शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, नाक कान व घसा श्वसन नलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

यावेळी नारायण वाघ, राजू भालेराव, जगदीश पाटील, डॉक्टर रतन त्रिभुवन, डॉक्टर अर्जुन काटे, अमोल भोसले, विकास बनसोडे, निखिल काटे, जयशेन त्रिभुवन, प्रकाश पाटील, प्रदीप यादव, गायत्री भिसेन, काजल कांबळे, प्रतिभा जयस्वाल आदी मान्यवर डॉक्टर यावेळी उपस्थित होते. यावेळी आलेल्या नागरिकांनी जितेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...