Wednesday, 13 July 2022

मुसळधार पावसाने मुरबाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत !! **सगळीकडे पाणी पाणी भरल्याने आपत्कालीन व्यवस्थेचे उडाले तिनतेरा ; मात्र जनसुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा व समाजसेवक उतरले रस्त्यावर **

मुसळधार पावसाने मुरबाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत !! 
 
**सगळीकडे पाणी पाणी भरल्याने आपत्कालीन व्यवस्थेचे उडाले तिनतेरा ; मात्र जनसुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा व समाजसेवक उतरले रस्त्यावर **     

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : गेल्या पाच-सहा दिवसांपासून वरुण राजाने सर्वत्र जोरदार सुरुवात केल्याने मुरबाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ज्या आपत्कालीन व्यवस्थेच्या भरवशावर सामान्य माणूस जगत असतो. तिच आपत्कालीन व्यवस्थेचे तिनतेरा वाजल्याने गोरगरीब व आपतग्रस्थांसाठी व प्रवासात अडकलेेेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी "सदरक्षणाय खलनिग्राह" ब्रिद असणारी खाकी वर्दीच आणि समाजसेवक उपयोगी पडत असल्याचे दिसून आले. पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला असतांना मुरबाड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या पाड्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


        **तर खुद्द मुरबाड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले... शहरातील विद्यानगर, अक्सिस बँक परिसर याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. म्हसा नाक्यावरील सहयोग प्लाझा शेजारील एका विकासकाने थेट नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह अरुंद केल्याने यंदा ही परिस्थिती आणखीनच भयानक झाल्याचे पाहावयला मिळाली आहे. 


मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर परंतू नदीच्या पलीकडे असलेल्या लांबाची वाडीचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.....
   **मुरबाड नगरपंचायत हद्दीतील खरब्याची वाडी येथून लांबाच्या वाडीकडे जाणारा रस्त्यावरील मुरबाडी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्याने या वाडीचा संपर्क तुटला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ६१ ते लांबाची वाडी येथील रस्ता नुकताच डांबरीकरण करण्यात आला होता. मात्र कमकुवतपणामुळे हा रस्ता उखडून गेला असून अनेक वर्षानंतर हा रस्ता नुकताच बनविण्यात आला होता. त्यामुळे उन्हाळ्यात पुन्हा येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्येला सामोरे जाण्याची परिस्थिती ओढवणार आहे.


किशोर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली...
    मुसळधार पावसाने मुरबाडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने किशोर गावा जवळ राष्ट्रीय महामार्ग ६१ यंदा पुन्हा पाणी पुराच्या पाण्याखाली आला आहे. त्यामुळे सुमारे सहा ते सात तास वाहतूक बंद होती. त्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी मोठ्याप्रमाणात अडकून पडलेले पाहायला मिळाले. याप्रसंगी मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आपल्या संपूर्ण फौजफाट्यासह तात्काळ हजर होते.त्यांच्या सोबत पीएसआय निंबाळकर, पोलीस नाईक खेडकर, पोलिस पाटील भोईर यांच्या टीमने रेस्क्यू करून अनेक विध्यार्थ्यांची पुराच्या पाण्यातून सुटका केली.

नाकाबंदी व तैनात पोलिस...
    राष्ट्रीय महामार्ग ६१ बंद असल्याने तिनहात नाका पोलिस चौकी जवळ महामार्गावर बॅरियर गेट लावून जुन्नर, माळशेज मार्गे येणाऱ्या वाहनांना सावध आणि सूचित करण्यात आले. मुरबाड पोलिस स्टेशनचे मेजर विजय गांजले यांनी भरपावसात ही कामगिरी चोख बजावली.

मोरोशी जवळ महामार्गावर झाड.....
    माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी जवळील न्याहाडी फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर मातीचा भराव आणि वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. याबाबत मुरबाडच्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे उडविलेले धिंडवडे सोशियल मीडियावर पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...