कांबा ग्रामपंचायतीची धडक कारवाई नैसर्गिक पाण्यास अडथळा ठरणारा नाला केला मोठा !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावर पाणी भरल्याने नेहमीच वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरणारा कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पाँवर हाऊस जवळील नाला जेसीबीच्या साह्यानं मोठा करण्यात आल्याने आता पावसाच्या पाण्यातील अडथळा दूर झाला आहे, त्यामुळे रस्त्यावर पाणी भरून वाहतूक कोंडी होणार नाही.
याप्रसंगी कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भगत, उपसरपं संदीप पावशे, सदस्य, अरुण सुरोशे, निकेश पावशे, प्रभाकर पावशे, लिपिक गुरुनाथ बनकरी, विशाल, सपना लाँन्सचे मालक किशोर ठाकूर आदी मंडळी उपस्थित होते.
कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ रोज वाईन समोर व कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पाँवर हाऊस येथे नेहमी पावसाळ्यात पाणी भरते,यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते, आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने येथे पावसाच्या पाण्यामुळे रस्ता बंद होतो. येथे नैसर्गिक नाला आहे, परंतु तो अंरुद असल्याने पाणी रस्त्यावर येथे, हे लक्षात येताच कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भगत, उपसरपंच संदिप पावशे, सदस्य अरुण सुरोशे, प्रभाकर पावशे, निकेश पावशे लिपिक गुरुनाथ बनकरी यांनी आदींनी या परीसराची पाहणी केली. व जेसीबी च्या साह्याने नाल्याची साफसफाई करून सपना लाँन्स मधील नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले. यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर करण्यात आला.
त्यामुळे आता कल्याण मुरबाड रस्त्यावर टाटा पाँवर हाऊस जवळ पाणी भरुन वाहतूक ठप्प होणार नाही असे सांगितले जाते.




No comments:
Post a Comment