आडीवली ढोकळी येथील रस्ता रुंदीकरणासाठी कुणाल पाटील यांची महापालिकेकडून निधीची मागणी !
डोंबिवली, बातमीदार : आडीवली ढोकळी हा परिसर 27 गावांमध्ये समाविष्ट होता. 27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडीवली ढोकळी परिसर महापालिकेतून वगळयात आला. आडीवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तूंबते आणि ते नागरीकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी कुणाल पाटील यांनी महापालिकेकडून निधीची मागणी केली होती. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना त्या वेळी पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे. ही संरक्षक भिंत नागरीकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र पावसाला संपल्यावर पुन्हा त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मूसळधार पाऊस झाला की नाल्यामुळे या बागातील चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. या प्रकरणी गेल्या पाच वर्षापासून पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment