Thursday, 7 July 2022

प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून रिक्षा स्टँडचे नुतनीकरण !

प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून रिक्षा स्टँडचे नुतनीकरण !


डोंबिवली, बातमीदार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, आमदार राजुदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या माध्यमातून व महाराष्ट्र सैनिक प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा स्टँडचे नुतनीकरण करण्यात आले. त्यांचे लोकार्पण सोहळा वाहतुक सेनेचे सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या शुभहस्ते माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत, उपजिल्हा सचिव अनंता म्हात्रे, शहर संघटक योगेश पाटील, शहर सचिव अरुण जांभळे, संदिप म्हात्रे, विभाग अध्यक्ष निषाद पाटील, रक्षीत गायकर, वाहतुक सेनेचे अनिल वरेकर,संजय बावीस्कर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


१२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून ही रिक्षा संघटना कार्यरत होते. हे सर्व राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेत विलीन झाले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, अजय कोंडे कोंडे, विजय मिश्रा, संजय साळवी, उपविभाग अध्यक्ष प्रदिप पाटील, उपशाखा अध्यक्ष निलेश मालप आणि महाराष्ट्र सैनिक व समस्त महिला पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...