Thursday, 7 July 2022

लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त ५००० वह्या वाटप ! "स्व. रमेश पप्पूदादा गुंजाळ" यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त ५००० वह्या वाटप !

"स्व. रमेश पप्पूदादा गुंजाळ" यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


अंबरनाथ, बातमीदार : लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंती निमित्ताने आनंदनगर एमआयडीसी अंबरनाथ परिसरातील आदिवासी पाड्यांमधील जिल्हा परिशद शाळांमधील विद्यार्थ्यांना पाच हजार वह्या वाटप करण्यात आले. 
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के हे देखील उपस्थित होते. ७ जुलै सकाळी १० वाजता ग्रीन सिटी शाखा येथे आमदार डॉ. बालाजी किनीकर, सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष, अब्दुल भाई शेख, माजी उपनगराध्यक्ष रवी करंजुले, माजी नगरसेवक, तसेच कार्यकर्ते यांच्या हस्ते मोरवली पाडा येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.


आनंद नगर एमआयडीसी येथील फणसेपाडा, बारकूपाडा, जांभिवली पाडा, जांभिवली गाव, ठाकूरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी भागातील गरजू विदयार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. ट्रॅफिक सुरक्षा रक्षक यांना देखील लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथच्या वतीने उमेश दादा गुंजाळ यांनी रेनकोट वाटप केले. अनेक वर्ष गुंजाळ याच्या माध्यमातून गरजूंना जिवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणत्याही प्रकारची कमी न होता शिक्षण कशाप्रकारे उत्तम घेता येईल या उद्देशाने गुंजाळ कुटुंबीय शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दरवर्षी करत असतात. 


उमेश गुंजाळ म्हणाले की, आपल्याला काही लागले तर आपण नीःसंकोच मला फोन करून सांगावे माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. यावेळी शिक्षक म्हणाले रमेश दादा गुंजाळ ज्यावेळेस होते तेही आम्हाला तेवढेच मदत करत होते. आणि आज त्यांचे बंधू उमेश गुंजाळ ते पण आम्हाला तेवढीच आपुलकीने विचारपूस करून आम्हाला मदत करत आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. 

यावेळी माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, सचिन गुंजाळ, स्वप्नील गुंजाळ, ओमकार गुंजाळ, संजय मेटकर, संजय गाढवे ज्येष्ठ शिवसैनिक, संतोष शिंदे, उमेश वाणी, सचिन गुंजाळ, सचिन चव्हाण, राकेश शेलार ,गायकवाड काका, ओझाजी निलेश कदम, स्वप्निल देशपांडे, अजय वाघमारे, अमित सय्यद, संतोष सारंगे, मिश्राजी, पांडेजी, मेटकर  मॅडम, साळुंखे मॅडम, पिंकी ताई, गणेश कलवार, नंदू ब्रह्मा, उमेष जगले, संतोश सारंगे, ब्रम्हविरन, महेष अडसूळ, सचिन सोनवणे, नागेष सकारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...