Thursday, 7 July 2022

भाजपा कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांचा सन्मान !

भाजपा कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांचा सन्मान !


कल्याण, बातमीदार : कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष तसेच परिवहन समिती सदस्य संजय बाबुराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कल्याण शहरातील पत्रकारांना कोरोना काळातील सेवेबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


६ जुलै म्हणजेच कोकण सुपुत्र, भाजपाचे कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष तसेच परिवहन समिती सदस्य संजय बाबुराव मोरे यांचा वाढदिवस. या निमित्ताने अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले होते. दिव्यांगाना ० बेलेन्स अकाउंट खोलून देण्यात आले, १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप तसेच निराधार व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. या दरम्यान समस्त दिव्यांगांच्या वतीने केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्या समवेत फ्रंट लाईन वर काम करणाऱ्या शहरातील पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व कल्याण जिल्हा सहसंयोजक मृत्युंजय शुक्ला यांच्या विध्यमाने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच पत्रकारांना भेट स्वरूपात काही भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संजय मोरे यांच्या समवेत कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, मृत्युंजय शुक्ला, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, नितेश म्हात्रे, वंदना मोर, तसेच इतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्याच प्रमाणे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व कल्याण जिल्हा सहसंयोजक मृत्युंजय शुक्ला यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...