मुरबाड मध्ये विद्युलता ताई पंडीत यांचा वाढदिवस सन्मान दिन म्हणून साजरा !!
** विद्यार्थी, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकारांना केले सन्मानित **
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलता ताई पंडीत यांचा 70 वा वाढदिवस नुकताच मुरबाड पंचायत समितीच्या स्व. शांताराम भाऊ घोलप सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांच्या विशेष सत्कार करून **सन्मान दिन ** म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पो.ना.विनायक खेडकर, श्रमजीवीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष- पंकज वाघ ,तालुका सचिव दिलीप शिद, सौ.कुंदा पुंजारा, महिला आघाडी प्रमुख, तालुका उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, सोपान देशमुख, सहाय्यक कार्यकारी अधिकारी नरेगा, तसेच तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
2 जुलै रोजी असणारा ताईंचा वाढदिवस 2 ते 7 जुलै यावेळेत संपूर्ण आठवडाभर श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलता ताई पंडीत यांचा वाढदिवस ठाणे, पालघर, रायगड, मुंबई सारख्या ठिकाणी विविध कार्यक्रमातून साजरा केला जातो. मात्र ह्या दिवशी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचा सत्कार, गुणगौरव व सन्मान करून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधुन मुरबाड तालुका शाखेच्या वतीने आज इयत्ता 10 व12 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून तसेच शालेय साहित्य वाटप करून करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जवळपास 100 हुन अधिक विद्यार्थ्याना तसेच ,समाजसेवक, पोलीस, प्रशासन, व पत्रकारांना शाल प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रमजीवी संघटनेची स्थापना 1982 साली झाली. तेव्हा पासुन संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित व त्यांच्या धर्मपत्नी विद्युलता ताई पंडीत यांनी अखंडपणे समाजातील दलित, पिडीत, शोषित घटकांना घटनेने दिलेले अधिकार प्राप्त करून देण्यासाठी अनेक लढे दिले. व सतत संघर्ष करून घरकुले, वनजमिनी, आदिवासी मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे म्हणून वस्ती शाळा, भोंगा शाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना, बालहक्क प्रकल्पाच्या माध्यमातून एकलव्य शिक्षण संस्था सुरु करुन समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याचे कार्य केले. मात्र देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात चमकायचे असेल तर, मोबाईल आणि टि.व्ही. या दोन वस्तूंपासून दुर राहिले पाहिजे. तरच उद्याचे भावी अधिकारी, समाजसेवक, राज्यकर्ते घडतील असा सल्ला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन दिला. शासन आणि प्रशासन खेडोपाडी शेवटच्या घटका पर्यंत सर्व सोयीसुविधा पोहचवत असतानाही आजच्या घडीला एकट्या मुरबाड तालुक्यात 444 शाळा बाह्य मुलं शिक्षणा पासून वंचित असल्याचा भितीदायक आकडा पुढे आला आहे. त्यासाठी सुध्दा संघटना प्रयत्नशील असल्याचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके यांनी सांगितले. गेली 40 वर्ष संघटना कार्यरत असुन तळागाळातील शेवटच्या घटकांना न्याय मिळेपर्यंत संघटना कार्यरत राहील. असे अभिवचन अध्यक्ष पंकज वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातुन दिले.


No comments:
Post a Comment