Wednesday, 6 July 2022

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची आमदार कुमार आयलानी यांनी घेतली दखल, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, बातम्यांचे बँनर झळकले !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची आमदार कुमार आयलानी यांनी घेतली दखल, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, बातम्यांचे बँनर झळकले !


कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ, वरप, कांबा, पाचवामैल आदी परिसरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्याबाबतीत व यामुळे पावशेपाडा येथील जेष्ठ शिवसैनिकाचा गेलेला बळी याची सविस्तर बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी विविध दैनिकामधून व चँनेलवरुन सचित्र प्रसिद्ध केली होती. याची दखल उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे. तर या बातमीचे बँनर वरप परिसरात झळकले आहेत.


कल्याण मुरबाड महामार्गावर सालाबादप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने खड्डे पडल्याची सचित्र बातमी सर्वप्रथम पत्रकार संजय कांबळे यांनी विविध दैनिकात व टिव्ही चँनेलवर प्रसिद्ध केली. यानंतर लगेचच पावशेपाडा येथील जेष्ठ शिवसैनिक नारायण महादू भोईर यांंचा  खड्यामुळे बळी गेला. त्यामुळे म्हारळ, वरप कांबा येथील खडयाने घेतला बळी,अश्या मथळ्याखाली बातमी विविध दैनिकात प्रसिद्ध होताच या परिसरातील समाजसेवक महेश देशमुख, सरपंच प्रगती कोंगिरे, माझी सरपंच प्रमोद देशमुख, कांबा येथील संजय भोईर, योगेश देशमुख, आदीनी आमदार कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा मुद्दा उचलून धरला, त्यामुळे आमदार आयलानी यांनी जनभावना लक्षात घेऊन या रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या मथळ्याखाली आलेल्या बातम्या चे भेले मोठे बँनर कल्याण मुरबाड महामार्गाच्या बाजूला लावलेले आहेत. यावर'आपण आणखी मृत्यू ची वाट.पाहात आहोत का?? एक दुर्दैवी मृत्यू, राष्ट्रीय महामार्ग आधिका-यांनी केलेली ही हत्या नाही का?? असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक, नागरिक, प्रवासी, हा बँनर बघून अधिकारी व ठेकेदारांना शिव्या शाप देत आहेत.

दरम्यान या रस्त्यावर प्रत्येक वर्षी मोठमोठे खड्डे पडतात, यामध्ये अपघात होतात, त्यामुळे हा मार्ग वेळेवर व खड्डे मुक्त करण्यासाठी वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूलचे व्यवस्थापक अलबिन सर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा, वेळ प्रसंगी शालेय विद्यार्थी चे अंदोलन देखील केले होते.

अगोदरच रस्त्यावर खड्डे अशातच कांबा पाचवामैल येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली,पावसाने बरीच उघडीप देऊनही या ठेकेदाराने एकही बाजू पुर्ण केली नाही, त्यामुळे खड्डे, चिखल, यामुळे या रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.त्यामुळे अजूनही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तथापि संबंधित ठेकेदारांकडून काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु मुसळधार पावसाने ते पुन्हा वाहून जाऊन' पुन्हा जैसे थे, नाही झाले म्हणजे देवच पावला,! असे झाले नाही तर भविष्यात या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा मनोदय अनेकांनी बोलून दाखवला.





 

 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...