Tuesday, 5 July 2022

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, उल्हास नदीच्या पाण्यात वाढ, रस्त्याला नाल्याचे स्वरूप, लोकांना त्रास !

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, उल्हास नदीच्या पाण्यात वाढ, रस्त्याला नाल्याचे स्वरूप, लोकांना त्रास !


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात धुमशान सुरू झाले असून यामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तर अगोदरच  खड्यामुळे म्हारळ, वरप, कांबा आदी परिसरातील नागरिक हैराण झाले असून आता तर मुसळधार पावसामुळे या रस्त्यालाच नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


कल्याण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला, म्हारळपाडा ते पाचवामैल असे कल्याण मुरबाड रस्त्याचे काम सुरू केले आहे. परंतु जागोजागी अर्धवट सोडलेले काम,कोणतीही एक बाजू पुर्ण न केल्याने होणारी वाहतूक कोंडी, मोठमोठे खड्डे, चिखल, यामुळे म्हारळ, वरप, कांबा, पाचवामैल इथपर्यंत प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालणे असाच आहे, नुकताच पावशेपाडा येथील जेष्ठ शिवसैनिक नारायण महादू भोईर यांचा खड्यामुळे बळी गेला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

अशातच आता मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अगोदरच खड्डे असल्याने म्हारळ पाडा, बंजरग हार्डवेअर, टाटा पावर हाऊस, कांबा पेट्रोल पंप, येथे रस्त्यावरील खड्यांचे नाल्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे येथून वाहन चालविने म्हणजे जिवाशी खेळ सुरू आहे असे वाहनचालकांचे म्हणनं आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ८६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आणे, मानिवली कांबा येथील छोट्या मोठ्या नाल्यावर वल्गनीचे मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...