'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या !
कोल्हापूर, बातमीदार : कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक घटना घडली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची आज मंगळवारी (ता.5 जुलै) दुपारी १२ वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला आणि हल्ल्यानंतर हे दोघेही तिथून पळून गेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी लगेच या घटनेचा तपास सुरू केला असून चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजींचे चरण स्पर्श केल्यानंतर त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले.

No comments:
Post a Comment