Tuesday, 5 July 2022

नवीन भाजपा -सेना युती सरकार मुळे मुरबाडच्या विकासाला चाळना मिळणार !! "आमदार किसन कथोरे"

नवीन भाजपा -सेना युती सरकार मुळे मुरबाडच्या विकासाला चाळना मिळणार !! "आमदार किसन कथोरे"

     
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : गेल्या आठ -पंधरा दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्या नंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे हे आज मुरबाड येथील त्यांच्या **कस्तुरी ** या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करत असताना, महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच गती मिळणार असून मुरबाडच्या विकासात नविन प्रकल्प  येऊन अधिक भर पडेल असे आमदार किसन कथोरे यांनी पञकारांशी मुरबाड येथे वार्तालाप करताना सांगितले.

मुरबाड तालुक्यातील आजमितीस रखडलेला कल्याण - मुरबाड नगर रस्ताचे चौपदरीकरण ,  माळशेज घाटातील स्काय वाॕक, टनेल यासह सरळगाव येथिल प्रस्तावित एम.आय.डी.सी. सारखे प्रकल्प सूद्धा पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तर तालुक्यातील विद्यार्थांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे येथे जावे लागते. ते प्रवास वेळ व खर्चिक बाब थांबावी. त्यासाठी लवकरच मुरबाड येथे मानव विकास मधून अडीच कोटीचे सुसज्ज असे स्पर्धा परिक्षा केंन्द्र व म्हसा येथे नाविन्यपूर्ण योजनेतून अभ्यासिका व खास मुलींसाठी वसतीगृह सुरु होणार असल्याची माहिती दिली. तसेच म्हसा येथे विधी काॕलेज तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी येथून माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या पाई दिंड्या व पालख्यांसाठी माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे येथे सुसज्ज असे भव्यदिव्य *निवारा भवन* उभारण्यात येणार आहे. यामध्ये निवारा , भोजनव्यवस्था निशुल्क देण्यात येणार आहे. 

तसेच आघाडी सरकारमुळे अनेक विकासकामांना खिळ बसलेली होती. ती या सरकारमुळे आपण पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी कथोरे यांनी व्यक्त केला. या पञकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर, जयवंत कराळे, आर.पी. आय. तालुका अध्यक्ष दिनेश उघडे उपस्थित होते. **मि मंत्री असलो किंवा नसलो, सरकार आमचे आहे. त्यामुळे मुरबाडच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही. "आमदार किसन कथोरे" यांचा ठाम विश्वास. **मंत्री पदापेक्षा माझ्या मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा, मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे, आणि उद्याही कार्यकर्ताच असेन, मात्र माझ्या मतदार संघाचा विकास, हा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एकच ध्यास असेल.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...