Tuesday, 5 July 2022

सह्याद्री कुणबी संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

सह्याद्री कुणबी संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !


पुणे, दिपक कारकर :- 

सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री कुणबी संघाला अजून एक पुरस्कार मिळाला.

पुण्यामध्ये कुणबी बांधवांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी सह्याद्री कुणबी संघाची स्थापना पुण्यात २०११ साली झाली. हे काम करत असताना आपल्या बरोबर आपल्या महिलांना ही समाजकार्यात सक्रिय करून २०१४ साली पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला आघाडी ची स्थापना करण्यात आली.त्यांनतर अशीच संघाची सामाजिक कार्यातील प्रगती वाढतच गेली संघटनेला आतापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारा सहित या अगोदर अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

स्मार्ट सखी मंच हा महिलांचा ग्रुप असून या मंचतर्फ़े विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी सह्याद्री कुणबी संघ महिला आघाडी सह पुणे शहरातील अजून चार महिला संस्थाना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एक विशेष म्हणजे ज्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला आघाडी ची स्थापना झाली. त्याच नाट्यगृहात महिला आघाडी ला पहिला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक स्तरावरून महिला आघाडी चे विशेष कौतूकासह अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...