वाडा / प्रतिनिधी :
सध्या शासनाकडून वन सप्ताह सुरू असून या अंतर्गत वाडा तालुक्यात वन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी वन महोत्सवाचे आयोजन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वनविभागाच्या वाडा पश्चिम वन परिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून कडून तालुक्यातील अबिटघर (आभानपाडा) येथे मंगळवारी (५ जून) वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे महत्व पटवून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन वाडा वनविभाग वाडा पश्चिम वन परिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नरेश आक्रे, माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य जगदिश पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अशोक गव्हाले, फॉरेस्टर धुरी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
तर वनविभागाच्या वाडा पूर्व वन परिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून कडून तालुक्यातील दुर्गम उज्जैनी परिसरातील भोकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत वन महोत्सव साजरा करण्यात आला.
या वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी वृक्ष संगोपन या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या परिसरातील जंगल व वन्य जीव यांचे संवर्धन करण्यासाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य मिळत असून यापुढेही वृक्ष व वन संपदा यांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहावे, असे आवाहन वाडा वन परिक्षेत्र अधिकारी प्रज्ञा वडमारे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनरक्षक अशोक पाटील, जिल्हा परिषद शिक्षक संतोष पाटील व ज्योती ठाकरे यांनी मेहनत घेतली.



No comments:
Post a Comment