*"शक्ती-तूरा नाचवा - लोककला वाचवा"*🎭
रसिक मायबाप हो ! प्रथम आपणास सप्रेम नमस्कार...आज सांगावस वाटतय की आपल्या कोकणच्या लाल मातीतील हि लोककला आपल्या वाड-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन करून ठेवली आहे आणि आता तोच वारसा आपल्या कोकणातील कलावंत जपण्याचा प्रयत्न करत आहेत, मुंबई सारख्या बलाढ्य शहरात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी व्यवसाय करत असताना त्यातूनच आवड म्हणून सवड काढून आपली लोककला जपण्याचा प्रयत्न करत आहेत... हे करत असताना आपल्या कलावंतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते कसे तर नाचणारी मूल वेगवेगळया ठिकाणी राहायला असतात अगदी चर्चगेट ते विरार - वाशी, ठाणे, दिवा, अंबरनाथ या टोकापासून त्या टोका पर्यंत अश्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत... संगीतकार देखील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला असतात, शाहिर एकीकडे राहणारा सहकारी वेगळ्या ठिकाणी राहणारे असतात , सांगायचं तात्पर्य हेच आहे की सगळे कलावंत वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वतःच्या खिशाला चॅट देऊन एकत्र येऊन तालीम करत असतात, अगदी रात्री-अपरात्री घरी जातात त्यात हि भरमसाट वाढलेली महागाई या कलेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव भयंकर वाढले आहेत आर्थिक झळ हि तेवढीच आहे... मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय त्याच मूळ कारण अस आहे आपले कलावंत एवढी मेहनत घेऊन जेव्हा एका कार्यक्रमाच आयोजन मुंबईच्या रंगमंचावर करतात तेव्हा त्या कार्यक्रमाचे तिकीट विकत घ्यायला आपण मागे पुढे करतो, फुकट मिळते का बघतो असं न करता सढळ हाताने आपण त्या कार्यक्रमाचे तिकीट विकत घेऊन त्या कलावंतांना सहकार्य करा कारण रसिक मायबाप हो आपणच या कलावंतांचे दैवत आहात आपणच आपला कलावंत आणि आपली लोककला टिकवण्यात आपला सहभाग आणि शुभाशीर्वाद द्याल तरच ही आपली लोककला कायम टिकून राहील... मायपाब हो तुमची सेवा करणे आमचे काम आहे मात्र आपली लोककला जिवंत ठेवणे हे तुमचे काम आहे,म्हणून हात जोडून विनंती करतो शक्ती-तूरा नाचवा लोककला वाचवा...!
✒️ *एक रंगभूमी सेवक - कवी/शाहीर - उमेश पोटले ( रायगड )*
_📲भ्रमणध्वनी - ९२२१३५३१७७_

No comments:
Post a Comment