मुरबाड शहरात बेशिस्त वाहन पार्किंग व वाहन चालकांवर पोलीसांकडून कायदेशीर कारवाई सत्र सुरु !!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : बदलत्या मुरबाड शहराचा चेहरा-मोहरा बदलत असताना, रस्तोरस्ती वाहनपार्किंग करून बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण केली जाते. प्रसंगी शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण, तसेच महिलांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे स्वच्छ-सुंदर आणि शिस्तबध्द मुरबाड शहराची अखंडता कायम राखण्यासाठी मुरबाड पोलीस पुढे सरसावले असुन, आज दिनांक ५/७/२२ रोजी मुरबाड शहरात मुख्य बाजार पेठ परिसरात बेकायदेशीर रित्या रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकावर तसेच तिनहात नाका येथे मुख्य महामार्गावर संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई केली आहे.
या पोलीस कारवाईचे सर्व व्यावसायिक व नागरिकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मुख्य बाजारपेठ रोड पोलीस कारवाई मुळे पुर्ण मोकळा झाला आहे. पर्यायी पार्किंग व्यवस्था असताना देखिल बेशिस्त पणा करून बाजार पेठेत रोडवर गाडी उभी करून जाणाऱ्या वाहन चालकांनी ह्या पुढे असे न करता पार्किंग मध्ये गाडी पार्क करावी. व बाजार पेठेत वाहतूक कोंडी होऊ नये ह्याची दक्षता घ्यावी असे पोलिसांनी सुचित केले आहे!


No comments:
Post a Comment