ठाणे-५ जुलै, २०२२ : रूस्तमजी ग्रुप, हा सध्याच्या सूक्ष्म बाजारपेठेतील एक महत्त्वपूर्ण रियल इस्टेट विकासक (अनेक प्रकारच्या घरकुल सहभागितेच्या बाबतीत) आहे. (स्त्रोत : ॲनारॉक रिपोर्ट), त्यांच्या वतीने ठाण्यामधील रूस्तमजी अपटाऊन अर्बेनिया येथे नवीन आणि अंतीम गृहसंकुल ला फॅमिलिया‘ची घोषणा करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी रूस्तमजी अपटाऊन अर्बेनिया लॉन्च झाला आहे लॉन्च झाल्यापासून २५ दिवसांच्या आत १०० घरांची विक्री देखील झाली. रूस्तमजी अपटाऊन अर्बेनिया हे सर्वसमावेशक गृहसंकुल असून वसाहतीतील जीवनशैलीला प्रोत्साहन देते, या माध्यमातून सर्व वयोगटातिल व्यक्तींना आवडतील अशा सुविधा उपल्बध आहेत यातील पहिल्या क्लस्टरचे नाव ला फॅमिलिया असे आहे व त्यात ३ विंगचा समावेश असलेली २ आणि ३ बीएचके घरे बाल्कनीसह उपलब्ध आहेत. या गृहसंकुलात सर्वात वरच्या २ मजल्यांवर मनोरंजनाची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये क्लबहाऊस आणि तळमजल्यावर इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे गृहसंकुल केप्पेल लँड, सिंगापूर या रूस्तमजी ग्रुपच्या भागीदारासह विकसीत करण्यात आले आहे. रूस्तमजी अपटाऊन अर्बनिया येथील वसाहतीत सर्वांसाठी विक्री प्रस्ताव उपलब्ध आहेत.
या गृहसंकुलाच्या विस्ताराबद्दल बोलताना अनुपम वर्मा – उपाध्यक्ष, ऑपरेशन्स कॅपस्टोन कन्सट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले की, “ज्यावेळी आम्ही रूस्तमजी अपटाऊन अर्बेनिया ची घोषणा केली, त्यावेळी रहिवासी वसाहत एका वेगळ्या उंचीवर नेत असल्याची आणि या १०० एकर जागेत सर्वोत्तम प्रस्ताव उपलब्ध करून देत असल्याची जाणीव आम्हाला होती. रूस्तमजी अपटाऊन अर्बेनिया येथे नवीन विंगची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असून नवीन कुटुंबांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या गृहसंकुलाच्या ठिकाणी आरेखनबद्ध गृहसंकुले, सोयी-सुविधा आणि अत्याधुनिक स्वरूपाचे बांधकाम उपलब्ध करून देण्यात आले आहे, या नवीन पर्यायाला खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, याची आम्हाला खातरजमा वाटते.”
रूस्तमजीविषयी माहिती:- रूस्तमजी ग्रुप हा मुंबई महानगर प्रदेशातील सुस्थापित ग्राहक-केंद्री ब्रँड आहे. आम्ही सूक्ष्म बाजारपेठेमधील एक अग्रगण्य रियल इस्टेट विकासक (अनेक प्रकारच्या घरकुल सहभागितेच्या बाबतीत) आहोत, सध्या आमचे अस्तित्व जुहू, वांद्रे पूर्व, खार, भांडुप, विरार आणि ठाणे येथे आहे (स्त्रोत: अॅनारॉक रिपोर्ट), आणि आमचे प्रकल्प ज्या भागांमध्ये स्थापित आहेत त्या एमएमआर सूक्ष्म बाजारांत महत्त्वपूर्ण किंमती मिळवण्यासाठी सक्षम आहे. ३१ मार्च २०२२ रोजी, आम्ही ३२ प्रकल्प पूर्ण केले असून १२ प्रकल्पांचे काम सुरू आहे तसेच एमएमआर पट्ट्यात १९ प्रकल्प आगामी काळात उभारले जाणार आहेत, या सर्वसमवेशी प्रकल्पांत किफायतशीर, मध्यम आणि महत्त्वाकांक्षी, महत्त्वपूर्ण आणि अति महत्त्वाची वर्गवारी आमच्या रूस्तमजी ब्रँड अंतर्गत उपलब्ध आहे. आमचा विश्वास आहे की, अडीच वर्षांसाठी एमएमआर बाजारातील आमचे अस्तित्व एकत्रित आमची बांधकाम गुणवत्ता, अमलबजावणी आणि डिलिव्हरी क्षमता दृढ करून एमएमआर भगत रूस्तमजी ब्रँड म्हणून नावारूपाला येण्यास मदत करत आहेत.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment