Saturday, 9 July 2022

सावित्रीबाई फुले विद्यालयात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी दिंडी !

सावित्रीबाई फुले विद्यालयात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी दिंडी !


मुंबई,  (शांताराम गुडेकर) :

         वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मूल मुली, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळा आणि टुलीप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शाळेत दिंडी आयोजित केली. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून विविध जातीतील वारकरी आषाढी एकादशीला पायीयात्रा काढतात. यंदाची आषाढी ही विशेष आहे. यंदा आषाढी आणि ईद एकाच दिवशी असल्याने या वारीला वेगळं महत्व आहे.
           साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेच्या संचालिका ज्योती राजेश सुभेदार आणि टुलीप इंग्लिश शाळेच्या सलोनी सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीला हिंदू मुल मुलीनं सोबत मुस्लिम मुल व मुली देखील सहभागी झाली. मुस्लिम वेशभूषा सादर केलेल्या मुलांनी दिंडी खांद्यावर घेत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विठ्ठलाचा जय घोष करत दिंडी काढण्यात आली.आषाढी वारीला वारकरी देवाशी एकरूप होतात. मानाची पालखी खांद्यावर घेत वारकरी महिना महिनाभर दिंडीत सहभागी होतात. विठुरायाच्या दर्शनासाठी विविध जातीतील लोक सहभाग घेत असतात. यंदाच्या आषाढीला ईद सुद्धा आहे. विद्यार्थ्यांमध्ये जातीपातीत भेद नसावा. माणुसकीतुनचं सण उत्सव साजरे करावे यासाठी शाळेत आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. यंदा आम्ही हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी दिंडी ही संकल्पना सादर केल्याचे संचालिका ज्योती सुभेदार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...