वसईत घरावर कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखाली वडील आणि मुलगी अडकले, बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु !
भिवंडी, दिं,१३, अरुण पाटील (कोपर) :
गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून नदी -नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पडणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पडझड सुरु आहे.अशाच प्रकारे आज वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखाली खाली वडील आणी मुलगी अडकले आहेत. त्यांना ढिगार्यातून बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु आहेत .
या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने आई वंदना सिंग (४०) आणि मुलगा ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही वडील अमित सिंग आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) हे ढिगाराखाली अडकले आहेत. आम्ही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती वसई विरार अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली"

No comments:
Post a Comment