कल्याण तालुक्याला पावसाचा तडाखा मोरयानगर मध्ये शिरले पाणी, अनेकांचे स्थंलातर, आपटी येथे म्हैस बुडाली, खडवलीत शाँक लगून गाईचा मृत्यू, !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोरयानगर या वस्तीत उल्हास नदीचे पाणी शिरले असून अनेकावर स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. तर आपटी येथील शेतकऱ्यांची म्हैस पाण्यात बुडून मरण पावली आहे, तसेच खडवली वावेघर मधील एका गाईला विजेचा शाँक लागूण मृत्यू झाला आहे व रूंदा येथील रस्त्यावर झाड पडल्याने या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान उल्हास नदी काटोकाट भरुन वाहत असून पाजरापोळ व कांबा येथील कल्याण मुरबाड रस्त्यावरील नाले पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याखाली जाऊन हा मार्ग बंद होऊ शकतो.
तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. पंरतु दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढू लागल्याने तालुक्यातील बारवी, काळू, भातसा आणि उल्हास या चारही नदी दुथडी भरून वाहत आहे, छोटे मोठे नाले देखील वेगाने वाहत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी राया ओझर्ली व पोई येथे घरांची पडझड झाली होती.
कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोरयानगर या वस्तीत उल्हास नदीचे पाणी शिरले आहे. ही लोकवस्ती अगदी नदीच्या काठावर असल्याने प्रत्येक वर्षी येथे पुरपरिस्थिती निर्माण होते. म्हणून ग्रामपंचायतीने येथील नागरिकांना अगोदरच नोटीस बजावली होती, व सुरक्षित स्थळी जाण्यस सांगितले होते. परंतु तरीही काही लोक न गेल्याने आज त्यांच्या वर स्थंलातरीत होण्याची वेळ आली. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली.
तर दुसरीकडेआपटी गावातील भगवान दुंदा शिसवे या शेतकऱ्यांची म्हैस पाण्यात बुडून मेली. कल्याण पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मादाने डी एस यांनी व त्यांच्या टिमने पीएम करून अहवाल दिला आहे. तर खडवली जवळील वावेघर येथील शेतकरी विशाल अशोक शेलार यांच्या गाईला विजेचा शाँक लागल्याने तिचा मृत्यू झाला तसेच रुंदा रस्त्यावर झाड पडल्याने या भागातील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.
दरम्यान टिटवाळा फळेगाव रस्त्यावरील काळू नदीचा पुल पाण्याखाली गेला आहे, तसेच उल्हास नदी काटोकाट भरून वाहत आहे, या नदीवरील रायते येथील पुल एक दोन मीटर बाकी आहे. तर पाजरापोळ, कांबा येथील नाले हे पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याखाली जाऊन कल्याण मुरबाड महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ शकते. रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश छोटे मोठे पुल,पाण्याखाली गेले आहेत.
कल्याण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी व विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण यांनी एन डि आर एफ टिम सोबत काही पुरसद्रुस भागाची पाहणी केली व ग्रामसेविकांना सूचना दिल्या आहेत.
ता.क. -
उल्हास नदीवरील रायते येथील पुल पाण्याखाली गेला नसला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
,






No comments:
Post a Comment