*( निवोशी / गुहागर : उदय दणदणे )*
गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र तसेच श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान (पालशेत) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नाना पालकर यांच्या माध्यमातून पालशेत आणि तालुक्यातील इतर गावातील गरजू मुलींना व ज्या मुलींची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते अश्या मुलीचं पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे समाजसेवी कार्य त्यांच्या हातून घडत आहे.
नुकतेच तालुक्यातील वेळंब गावातील जिल्हा परिषद शाळा घाडेवाडी, वचनवाडी ,नालेवाडी या शाळांना वेळंब गावचे पोलिस पाटील श्री स्वप्नील तुकाराम बारागोडे यांच्या प्रयत्नांतून दिनांक ०९ जुलै २०२२ शनिवार रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नालेवाडीतील ग्रामस्थ श्री शरद पवार, श्री दत्तात्रय वेल्हाळ, श्री राजेश नांदलस्कर, श्री रमेश पवार, तसेच वचन वाडीतील ग्रामस्थ श्री बबन कुंभार, सौ आरवलकर, व शाळांचे व्यवस्थापन समिती सदस्य व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सर्व उपस्थितांच्या वतीने श्री नाना पालकर यांचे आभार मानण्यात आले.



No comments:
Post a Comment