मोखाडा तालुक्यात खताचा पुरवठा तातडीने करावा-प्रदीप वाघ.
जव्हार- जितेंद्र मोरघा :
खरीप हंगामातील शेतीच्या कामांना वेग आला असून, भात लावणी सुरू झाली आहे. पाऊस पण योग्य प्रमाणात सुरू झाला आहे. परंतु शेतकऱ्यांना पुरेसा प्रमाणात खत मिळत नाही.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा भागात तर खतच नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची खताची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हा कृषी अधिकारी यांनी तातडीने खत पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी व प्रदीप वाघ यांनी जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे केली आहे.

No comments:
Post a Comment