Thursday, 7 July 2022

भाजप नेते शिवाजी आव्हाड यांच्यातर्फे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव !!

भाजप नेते शिवाजी आव्हाड यांच्यातर्फे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव !!


ठाणे, बातमीदार : भाजप नेते शिवाजी आव्हाड यांच्यातर्फे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते शिवाजी आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीतील भोपर विभागातील जे. पाटील विद्यालयातील10 वी12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते शिवाजी आव्हाड यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन गौरविले. आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना प्रोत्साहन देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील, मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, उपमुख्य शिक्षिका तेजस सोनवणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...